वारंवार शारीरिक संबंध अन् नंतर गोळ्या देऊन…

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: नवी मुंबईत उलवेतील एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. इतकेच नव्हे, तर या संबंधातून ती गरोदर राहिली मात्र, तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आल. या प्रकरणातीला मोहित विरेंद्र सिंग या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार

पीडित तरुणीने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये पीडिताची मोहितशी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. मोहितने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचं आमिष दाखवलं. पीडितेला लग्नाची खोटी स्वप्नं दाखवून आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार झाल्यामुळे पीडिता गरोदर राहिली.

गर्भपाताच्या गोळ्या देऊन बळजबरीने…

पीडित तरुणी गर्भवती असल्याचं समजताच मोहितने मेडिकल स्टोरमधून तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. आरोपीने तरुणीला बळजबरीने त्या गोळ्या खायल्या दिल्या आणि गर्भापात करण्यास भाग पाडलं. इतकेच नव्हे, तर गर्भापाताच्या वेळी तरुणीला रक्तस्त्राव झाला आणि त्यावेळी मोहितने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. हेच फोटो दाखवून आरोपीने पुन्हा पीडतेला ब्लॅकमेल करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू लागला.

पोलिसांकडून आरोपीला अटक

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून मोहितला अटक करण्यात आली आहे. तसेच, गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू असून पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असल्याचं उलवे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेने नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.