शिरुर तालुक्यात चारचाकी गाडी अडवून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील मयुर लॉन्स मंगल कार्यालयातील लग्न समारंभ उरकुन चारचाकी गाडीने घरी जात असताना दुचाकी गाडीवरुन आलेल्या तीन जणांनी चारचाकी गाडी अडवत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच चारचाकी गाडीवर दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्याने यात चारचाकी गाडीतील एकजण जखमी झाला असुन याबाबत दादाभाऊ महादेव घेगडे (वय 37) रा. माठ, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने अरबाज शेख याच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि 11) रोजी सायंकाळी 7:38 च्या सुमारास फिर्यादी दादाभाऊ घेगडे तर्डोबाची वाडी येथील मयुर लॉन्स मंगल कार्यालयात लग्न लावुन सोबत असलेले मित्र आणि त्यांचा भाऊ प्रविण घेगडे यांच्या चारचाकी स्कार्पिओ MH 12 MV 7407 मध्ये बसुन गोलेगाव-शिरुर रोडने त्यांच्या गावी माठ (ता. श्रीगोंदा) येथे जाण्यासाठी निघाले असता असता अचानक त्यांच्या पाठीमागुन एक दुचाकी बुलेट मोटार आली. त्यावर अरबाज शेख (रा. शिरुर ता. शिरुर, जि. पुणे आणि दोन अनोळखी इसम असे तिघेजण आले.

त्यांनी फिर्यादीच्या स्कार्पिओ गाडीच्या समोर बुलेट आडवी लावुन गाडी थांबविली आणि पप्पु राजापुरे व सुधीर घेगडेच्या नादी लागतो काय, असे म्हणत अरबाज शेख आणि त्याच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी असे लोकांनी स्कार्पिओवर दगड फेकून मारले. त्यात दशरथ पाडुरंग पंदरकर यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. तसेच पप्पु राजापुरेचे नादी लागलात तर गोळ्या घालून मारुन टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.