dp-robbery

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर आली असून, चव्हाणवाडी (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्याने विद्युत रोहित्र फोडून त्यातील सुमारे ३० किलो वजनाची तांब्याची कॉइल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी रोहित्रातील ऑइल जमिनीवर […]

अधिक वाचा..
shindodi-society

शिंदोडी विकास सोसायटीची आर्थिक भरारी; शेतकऱ्यांना साडेसहा कोटींहून अधिक कर्जपुरवठा; लाभांश वाटप…

शिंदोडी (तेजस फडके) : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हतेचा आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या आर्थिक ताळेबंदातून ही प्रगती अधोरेखित झाली असून, ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेने यावर्षी १७ लाख ११ हजार ९६६ रुपयांचा नफा नोंदविला आहे. तर ३० सप्टेंबर २०२६ […]

अधिक वाचा..
sand-mafia-shirur

Video! चिंचणीच्या गायरान जमिनीवर वाळूमाफियांचा बेकायदेशीर कब्जा; महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष की अभय…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात गेल्या पाच वर्षांपासून बेकायदेशीर वाळू उपशाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता वाळूमाफियांनी गावातील गायरान जमिनीलाच आपल्या बेकायदेशीर वाळू साठवणुकीचा अड्डा बनवल्याचे चित्र समोर येत आहे. गावाच्या सार्वजनिक वापरासाठी आणि जनावरांच्या चराईसाठी राखीव असलेल्या गायरान जमिनीचा वापर बेकायदेशीररीत्या वाळू साठवण्यासाठी होत असेल, तर हा केवळ शासकीय जमिनीचा […]

अधिक वाचा..
gunat-accident

गुनाटमध्ये भरधाव मोटारसायकलची शाळकरी मुलाच्या सायकलला पाठीमागून धडक; बालक गंभीर जखमी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाने सायकलवरुन जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सदर मुलगा गंभीर जखमी झाला असून, अपघात घडल्यानंतर जखमी बालकाला कोणतीही वैद्यकीय मदत न करता मोटारसायकल चालक घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. […]

अधिक वाचा..
malthan-accident

शिरूर! मलठणमध्ये अष्टविनायक महामार्गावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

मलठण (सुनिल जिते) : अष्टविनायक महामार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना मलठण (ता. शिरूर) येथे घडली आहे. स्नेहल हॉटेलसमोर रविवारी (ता. १) रात्री पावणे नऊच्या सुमारास एर्टिगा कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावर वाहन सोडून […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन तब्बल २ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील कोळपेवस्ती येथे घडली आहे. गुरुवारी (ता. २९) भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्याने घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये चिंता […]

अधिक वाचा..
zende-family-aamble

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून गुरुवारी (ता. २९) रात्री ११ च्या दरम्यानपायी घरी परतणाऱ्या झेंडे कुटुंबातील तिघांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शिरूर-चौफुला रस्त्यावरील हॉटेल केसरीसमोर गुरुवारी (दि. २९) रात्री […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याला संपविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळखीच्याच व्यक्तीने कोणत्यातरी कारणावरुन थेट गळ्यावर वार केल्याने ३५ वर्षीय इस्लाम सलाम शेख गंभीर जखमी झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी दानिश शेख याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी […]

अधिक वाचा..
shirur-crime

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि यापुर्वी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग… या दोन कारणांवरुन शिंदेवाडी येथे दोन गटांमध्ये वाद उफाळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचे गंभीर आरोप करत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. दि २७ ऑक्टोबर […]

अधिक वाचा..
shikrapur-police

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. दीपक बाळासाहेब ऊर्फ बाळू ढेरंगे (वय ३७, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत यापूर्वी दहा गुन्हे […]

अधिक वाचा..