गंगापेट्रोल पंपाजवळ तिघांकडून व्यापाऱ्यावर हल्ला, शिरूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गंगापेट्रोल पंप परिसरात किरकोळ कारणावरून तिघा अनोळखी इसमांनी व्यापाऱ्यावर हल्ला करून मारहाण केली. या घटनेत व्यापाऱ्याला डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सिताराम चिपाडे (वय ४०, व्यवसाय – व्यापारी, रा. बोराडेमळा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता शिरूर गंगा पेट्रोल पंप परिसरात तिघा अनोळखी इसमांनी “हॉर्न का वाजवतोस?” असा वाद घालत त्यांना खाली पाडून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करत आरोपींपैकी एकाने जवळ पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारहाण केली, ज्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली. तसेच “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार आर. एस. साबळे हे करत आहे. शिरूर शहर व परिसरात वारंवार होणाऱ्या हाणामाऱ्या, चोऱ्या, गुंडगिरी, अवैध्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून शिरूर शहरात कायदा सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.या वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत