शिरूर शहराजवळील ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगरमधील ओपन प्लॉट झाले कचराकुंड्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरालगत शिरूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विकसित झालेल्या बाबुरावनगर या उपनगरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वर्गीय बाबुरावजी पाचर्णे यांच्या दूरदृष्टीतून मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत आणि शिरूर शहराला पर्याय म्हणून बाबुरावनगरची उभारणी करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात सुमारे अडीच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, शाळा, रस्ते […]

अधिक वाचा..

गंगापेट्रोल पंपाजवळ तिघांकडून व्यापाऱ्यावर हल्ला, शिरूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गंगापेट्रोल पंप परिसरात किरकोळ कारणावरून तिघा अनोळखी इसमांनी व्यापाऱ्यावर हल्ला करून मारहाण केली. या घटनेत व्यापाऱ्याला डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सिताराम चिपाडे (वय ४०, व्यवसाय – व्यापारी, रा. बोराडेमळा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी […]

अधिक वाचा..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा; अजित पवार

मुंबई: पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यासाठी स्मारकाच्या सभोवतालचे रहिवाशाना हलविणे आवश्यक आहे. जे रहिवाशी पर्यायी जागेवर जाण्यास तयार आहेत, त्यांचे  स्थलांतर करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..

मानखुर्द महामार्गा लगतच्या रहिवाशांचे एस आर ए मार्फत सर्वेक्षण करून पुनर्वसन करावे; शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात सदर महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत. त्या जमिनीचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) च्या मार्फत सर्वेक्षण करून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले. सह्याद्री मित्र मंडळ […]

अधिक वाचा..

चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय?

अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि ॲसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला आढळला जळालेला मृतदेह

शिरुर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली असून घटनास्थळी शिक्रापूर पोलीस तातडीने दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एक मृतदेह असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे नजिक कारच्या धडकेत पत्नी ठार पती जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) नजिक पिंपरी सांडस रस्त्याच्या कडेला पांढरी वस्ती येथे दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात जयश्री शिवाजी गरुड ही महिला ठार तर शिवाजी तुकाराम गरुड हे गंभीर जखमी झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील तळेगाव ढमढेरे ते […]

अधिक वाचा..

त्या पुरोहिताची हत्या; मृतदेहाजवळ आढळले ‘वशीकरण’ पुस्तक..

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हत्या आणि मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच आता वैजापुरातही एका पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानं जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या ५५ वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली […]

अधिक वाचा..