प्रत्येक महाराष्ट्रीयनच खरा ‘बिग बॉस’; अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे स्पष्ट मत

मनोरंजन

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अभिनयाची छाप अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तसेच ‘वाडा चिरेबंदी’सारख्या नाटकांतून उमटली आहे.

निवेदिता सराफ या नेहमीच आपले मत स्पष्टपणे आणि बिनधास्तपणे मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी “महाराष्ट्राचा खरा बिग बॉस कोण?” या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अशोक सराफ यांना पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांना “तुमच्या मते खरा महाराष्ट्रीयन कोण?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना निवेदिता सराफ म्हणाल्या, “सगळेच महाराष्ट्रातील खरे महाराष्ट्रीयन आहेत. फक्त जन्मभूमी नव्हे, तर ज्यांची ही कर्मभूमी आहे आणि ज्यांच्या मनात या राज्याबद्दल तसेच मराठी भाषेबद्दल आदर आहे, ते सर्व महाराष्ट्रीयन आहेत.”

याच मुलाखतीत पुढे त्यांना “महाराष्ट्राचे खरे ‘बिग बॉस’ कोण?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हसत त्यांनी उत्तर दिले, “प्रत्येक महाराष्ट्रीयन हा बिग बॉसच आहे.”दरम्यान, निवेदिता सराफ या शेवटच्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत दिसल्या होत्या. तसेच त्यांच्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.