जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

भविष्य

मेषः वाहन,घर प्रॉपर्टी खरेदी अचानक होईल. पैसे मिळवाल पण खर्चावर आळा घालण्यास विसरू नका. भावंडांशी वादविवाद टाळा.नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीच्या बाबतीत जपूनच अचानक संकट येण्याची संभावना आहे. मित्र, नातेवाईकांशी व्यवहार जपून करावे. फसवणुकीपासून सावधानता बाळगलेली कधीही चांगली.

वृषभः कामात सातत्य ठेवा. श्रद्धा आणि सबुरी हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून न कंटाळता कार्यरत राहणे गरजेचे आहे. पैसे गुंतवताना संयम बाळगा. संताप आणि चिडचिड निर्माण करेल. तसेच या महिन्यात खर्चावर नियंत्रण करावे लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत.

मिथुनः बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरूर मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीदायक यश मिळणार आहे. आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल. कोर्टकचेरीच्या कामांसाठी काळ अनुकूल आहे. आपण विवाहाच्या विचारात असाल तर विवाह खात्रीशीर उत्तम पार पडेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल. नोकरवर्गाने वरिष्ठांशी संयमाने वागावे लागणार आहे. आपली बदली मनाविरुद्ध होण्याची संभावना आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

कर्कः आर्थिक व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. लाभापासून दूरावले जाल. मित्र मंडळी, नातेवाईक यांच्याशी वादविवादाची परिस्थिती निर्माण होईल. घरातील वरिष्ठांची काळजी घेणे जरुरीचे आहे. सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग आहे. त्यांना बहुमान मिळण्याची संभावना आहे. व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल.

सिंह: स्वत:च्या नातेवाईकांकडून अपमान होण्याची शक्यता आहे. तरुण तरुणींचे विवाहाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. तिच्या आजारपणामुळे दगदग वाढेल. आपला स्वभाव त्यागी चंचल असा राहील. संतती विषयी चिंता निर्माण होतील. डोळ्याचे विकार होण्याची शक्यता आहे. नातेवाईकाकडून फसवणूक होईल. भागीदारासोबत वादविवाद टाळा.

कन्याः आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले बरे. जोडीदाराशी आपले विचार कमी जुळतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष कruन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील. प्रयत्नांती परमेश्वर याचा काहीसा अनुभव आपणास येईल.

तूळ: वाहन प्रवास आपणास करण्यास आवडत असला तरी थोडासा आवर घालावा लागणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढते ठेवणारा आहे. तेव्हा खर्च जपूनच करावा लागणारआहे. शेअर्स अधिकची गुंतवणूक सध्या फायदेशीर नाही. सध्या प्रेमी युगुलांनी प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे. फसवणुकीची संभावना आहे. कर्ज प्रकरणामुळे त्रास होईल. महिला वर्गाने आपले आरोग्य जपणे गरजेचे आहे.

वृश्चिकः आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारांकडूनआपणास आर्थिक आवक मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धीपण मिळेल. आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको. महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल.

धनुः शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभवास येईल. प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे. आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वत:च्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल.

मकरः कामाचा वेग नक्कीच वाढेल. आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला या वेळी साथ देणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. वडिलार्जित लेखक वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही, तेव्हा व्यवहार जपूनच करावा.

कुंभः काळ भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी राहील. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनवीन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहे. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती कामाचा उरक वाढविला पाहिजे. घरातील वरिष्ठांची काळजी आपणाला वाटेल.

मीनः शेतकरी विद्यार्थ्यांना अभ्यासातील दुर्लक्ष महागात पडेल. आपणाला आपल्या वडिलार्जित इस्टेटीचे महत्त्व पटणार आहे. जमिनीपासून आर्थिक लाभ उत्पन्नातून होईल. घरातील वातावरण ताणतणावात्मक राहील. व्यवसायिकांचे उद्योगधंद्यात लक्ष केंद्रीत कमी होईल. आपला इतरांशी स्नेह वाढेल. नोकरदारांना काळ प्रतिकूल आहे. महिला वर्गास प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. वाहन प्रवासात काळजी घेणे जरुरीचे आहे. घरातील मतभेद सामोपचाराने मिटविलेले बरे अन्यथा त्रासदायक जातील.