मुंबई: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या सहकार्याने ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा मुंबई प्रशिक्षणाचे केंद्र चालवले जाते या केंद्रातर्फे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांतून ग्रंथालय प्रशिक्षणाचे वर्ग गेले ४० ते ४५ वर्षे सातत्याने यशस्वी चालवले जातात. किमान माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी उत्तीर्ण) झालेल्या उमेदवारांसाठी तीन महिने कालावधीचा ‘ग्रंथालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचलनालयतर्फे चालवण्यात येतो.
राज्य ग्रंथालय संघ आणि विभागीय ग्रंथालय संघामार्फत त्यांच्या जिल्हा ग्रंथालय संघाच्या मदतीने जिल्ह्याच्या ठिकाणी माहे मार्च /एप्रिल/ मे महिन्यात हे वर्ग चालवण्याची मान्यता ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात येते. या अभ्यासक्रमाची दरवर्षी जूनमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचनालयातर्फे परीक्षा घेऊन उत्तीर्ण उमेदवारांना शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येते. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शालेय आणि सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. या अभ्यासक्रमाचे अर्ज वितरण १ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाले असून अर्ज वितरण मंगळवार ते शनिवार ११ ते ५ व रविवारी सकाळी ८ ते ११ (सोमवारी कार्यालयीन सुट्टी वगळून ) वेळेत केले जाते. अधिक माहितीसाठी ९८२०४८१४८७ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१ मार्च २०२३ पासून संध्याकाळी ६ ते ८ या वेळेस वर्ग असणार आहेत अशी माहिती मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे व बृहन्मुंबई मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सुनील कुबल यांनी दिली आहे