मेष: आजचा दिवस उत्तम असून करिअरच्या बाबतीत शुभलाभ आहे. सरकारकडून मानसन्मान होण्याची शक्यता. कुटुंबाच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. तुमचे काम पुढे जावे म्हणऊन तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत आहात, त्याबदद्ल सकारात्मक निर्णय मिळतील. तुम्हाला कर्ज मिळेल आणि तुमच्या कामात प्रगती होईल. जुने मित्र मदत करतील तसेच जोडीदारासकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
वृषभ: आजचा दिवस चांगला असून तुम्ही दिवसभर कामात व्यस्त राहणार आहात. दिवसभराच्या धावपळीमुळे तुम्हाल संध्याकाळी थकवा जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या कारण पायात दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमच्या निर्णयक्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल आणि प्रगतीचे उत्तम योग आहेत. थांबलेली कामे पूर्ण होतील. कोणत्याही कामात बदल करावा लागला तर नक्की करा, तुम्हाला पुढे जावून लाभ मिळेल.
मिथुन: आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही सावध रहावे. तुम्ही जे काही काम करत आहात त्याबद्दल सतर्क राहा. अनावश्यक खर्च टाळा. सामाजिक कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. धावपळ जास्त होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कामात रूची घेणार आहात. व्यवसायात लाभ असून मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल.
कर्क: आजचा दिवस चांगला असून तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. मेहनतीचे फळ मिळणार आहे तसेच ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. मुलांनी केलेल्या कामांमुळे तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायात उत्तम नफा आहे तसेच कामात सहकारी चांगल्याप्रकारे मदत करतील. आज मौजमजा करण्यासाठी जास्त खर्च करणार आहात. कुटुंबातील प्रत्येकाचे सहकार्य तुम्हाला मिळेल आणि तुमची कामे मार्गी लागतील.
सिंह: आजचा दिवस संमिश्र असून काही कारणांमुळे मानसिक अशांतता आणि निराशा येऊ शकते. तुमचे मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महत्त्वाची कामे अपुरी राहू शकतात. आईृ-वडिलांच्या मदतीमुळे तुम्हाला कामाच्या बाबतीत काही नवीन संधी मिळतील त्याचा लाभ घ्या. सासरकडून काही कारणाने नाराजी झेलावी लागेल. मधुर वाणीचा वापर करा अन्यथा नात्यात ताण वाढेल.
कन्या: आजचा दिवस सुख आणि संपन्नतेने भरलेला आहे. प्रत्येक कार्य तुम्ही भीतीशिवाय पूर्ण कराल. घरातील प्रत्येकाचे तुम्हाला सहकार्य मिळेल. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्या. निरर्थक खर्च होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते. तुम्हाला इतरांच्या कामासाठी जास्त धावपळ होणार आहे. ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
तुळ: आजचा दिवस शुभ असून धनलाभाची शक्यता आहे. तुमचे अधिकार आणि बँक बॅलन्स दोन्ही वाढणार आहेत. तुम्ही इतरांसाठी काम कराल तसेच सगळ्यांना मदत करून तुम्हाला समाधान मिळेल. नवीन कार्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला लाभ होईल. व्यवसायात काळ सुखाचा असून नफा होणार आहे.
वृश्चिक: आजचा दिवस तणावपूर्ण असेल. तुमचे मन अशांत राहणार असून एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देवू शकते. व्यापार वाढीसाठी केलेले प्रयत्न निष्फळ होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. तुमची हुशारी आणि धैर्य यामुळे तुम्हाला लाभ होईल. वादविवादापासून दूर राहा आणि समजा वाद झाला तर तुम्ही शांत राहा.
धनु: आजचा दिवस शुभ असून तुमच्या ज्ञानात वाढ होणार आहे. दानपुण्याची कामे कराल. मानसिक समाधान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज थोडी धावपळ करावी लागू शकते आणि त्यात तुमचा खर्च जास्त होईल. तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, जंक फूड खाणे कमी करा.
मकर: आजचा दिवस चांगला असून प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल. मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळू शकते. काही अनावश्यक खर्च होणार आहेत पण ते करावे लागतील. सासरकडून मान-सन्मान मिळेल. व्यवसायात खास लक्ष देणार असून अडलेले कामे पूर्ण होतील. तुम्हाला नवीन कार्यात गुंतवणूक करावी लागली, त्याचा फायदा भविष्यात मिळेल.
कुंभ: आजचा दिवस शुभ असून करिअरच्या बाबतीत लाभ आहे. तुमचा वेळ नवीन कामे करण्यात व्यतीत होणार आहे. तुम्ही मर्यादित आणि जेवढी गरज आहे तेव्हढा खर्च करणार आहात. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल तसेच घरात वातावरण उत्तम असेल. संध्याकाळी कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात.
मीन: आजचा दिवस फारसा ठिक नाही. करिअरच्या बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम मनाशी ठरवून आणि पूर्ण विचार करूनच करा. वादावर तोडगा निघेल. तुमची कामातील हुशारी, आनंदी स्वभाव आणि समजूतदारपणा यामुळे इतर लोक तुमच्यासोबत चांगले संबंध ठेवतील. कुटुंबासोबत संध्याकाळी आनंदात वेळ व्यतीत करणार आहात.