फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे 

आरोग्य

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं. सकाळी नाश्त्या ऐवजी फ्रूट ज्यूस पिणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. फळांचा रस शरीराला पुरवतात ऊर्जा अगदी त्वरित. ज्यूस टेस्टी तर असतोच, पण स्वादाबरोबरच तो देतो आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, आंतरिक मजबुती आणि सुधारते व्यक्तिमत्त्व. ज्युससाठी खास फळे व भाज्या, सफरचंद, द्राक्षे, लिंबू, कलिंगड ,संत्री, अननस, टोमॅटो, मोड आलेले हरभरे इत्यादींचा समावेश करावा.

फायदे

1) एझाइम्स: ताजी फळे आणि भाज्या म्हणजे एझाइम्सचा उत्तम स्त्रोत. एझाइम्समुळे शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात.

2) फायटो केमिकल्स: आजारपणापासून बचाव करून आपले आरोग्य सांभाळतात. फायटो केमिकल्सचे अनेक प्रकार आहेत. एका संत्र्या मध्येच १७० प्रकारची फायटो केमिकल्स असतात.

3) सुपच्यता: ज्यूस मध्ये एझाइम्स असल्याने ती पचनास मदत करतात. सहजपणे पचतात. शारीरिक ऊर्जा वाढवतात. या मधील ९९ टक्के पोषकद्रव्ये शरीरात शोषण केली जातात.

4) ऊर्जा: यामध्ये शर्करा भरपूर प्रमाणात असल्याने लगेच ऊर्जा देतात. ताजेतवाने करतात.

5) आम्ल-क्षार समतोल: बऱ्याचशा शारीरिक समस्या या अधिक मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ खाण्याने निर्माण होतात. अतितणावामुळेही असिडीटी वाढते; परंतु नियमितपणे फळांचा रस घेतल्याने आम्ल-क्षार समतोल राखला जातो.

6) हायद्रेशन: ज्यूस शरीराचा डिहायड्रेशन पासून बचाव करतात.

7) ज्यूस बनविताना दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे उत्तम दर्जाची फळे आणि दुसरे म्हणजे चांगला ज्यूसर, चांगली तयार झालेली मधुर, ताजी मोसमी फळे निवडावीत.

8) फळे आणि भाज्यांचा ज्यूस एकाच ब्लेंडर मध्ये काढू नये. त्याचा स्वाद बिघडतो.

9) वेगळ्या ज्युस मुळे मूत्रपिंडावर ताण पडतो, म्हणून तो कमीत कमी प्रमाणात घ्यावा.

10) फ्रीज मध्ये फार काळ टोमॅटो ठेवू नयेत.

11) भाज्यांचा ज्यूस देठासह काढायचा असेल, तर देठ व पाने चिरून वेगळी करावी

12) ज्युसची गोडी कमी करण्यासाठी त्यात थोडे पाणी मिसळावे.

13) डायबिटीज वा क्रोनिक ग्लायसिमियाच्या रुग्णांनी ज्यूस अधिक प्रमाणात घेऊ नये. त्यात शुगर वाढण्याचा संभाव असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत