जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

भविष्य

मेषः आज दिनमान प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज असंतोषाची भावना निर्माण होईल. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. वादविवादातून मनस्ताप होईल. खर्चात वाढ होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा. दुर्व्यसनांपासून सावध रहा.

वृषभ: आज व्यक्तीगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. चोरी अथवा नुकसान घडण्याची शक्यता आहे.

मिथुन: कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढीस लागेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढ़ती व वेतन वाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. राजकीय सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजाश्रय मिळेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क: आज कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात सबुरीने वाटचाल करा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहिल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल.

सिंह: नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. शासकीय सेवेत नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखक कला क्षेत्रातील व्यक्तींना शासकीय मानसन्मान मिळेल.

कन्या: आज दैवी पाठबळ लाभणार आहे. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढ़ती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. साहित्यिक संपादन या बौद्धिक अधिष्ठान असणाऱ्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक बाबतीत वाढ होईल.

तूळ: आज रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस काहीसा परिक्षा घेणारा आहे. प्रतिकूलता जाणवेल. कामाच्या ठिकाणी ताणतणात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या समस्या उद्भवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. आर्थिक हानीची शक्यता वाटते. चिंता वाढविणारा दिवस असुन मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी.

वृश्चिक: आज कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. सर्वच स्तरातील नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल.

धनु: व्यापारी वर्गानी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. नोकरीत वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. शारिरिक त्रास जुना आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकिय उपचारा वर खर्च होण्याची शक्यता आहे.

मकर: आज सकारात्मक उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहिल. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कला क्षेत्रातील मनोरंजन विश्वातील मंडळीना उत्तम दिवस आहे.

कुंभ: सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. आकस्मिक लाभाचा योग आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्रि करताना घाईगडबड करू नका. दुसऱ्याच्या कामात मात्र हस्तक्षेप करू नका.

मीनः आज आपले मनोधैर्य उंचाविणारा दिवस आहे. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल.