निमोणे येथील खुनाचा तपास चालु असताना एका शेतमजुराने आत्महत्या केल्याने खळबळ

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) निमोणे – मोटेवाडी रोड लगत चार दिवसांपुर्वी अज्ञात इसमाने चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून मनोहर शितोळे यांना गंभीर जखमी करून त्यांचा निर्घृणपणे खुन केला होता. त्याच ठिकाणी खुन झालेल्या इसमाच्या नातेवाईकांच्या शेतमजूराने आत्महत्या केल्याने निमोणे परिसरात वेगवेगळया चर्चेला उधान आले असुन खुणाचे गुढ अदयाप उकलले नसल्याने आणि त्यानंतर शेतमजुराने आत्महत्या केल्याने पोलिसांपुढे या दोन्ही गोष्टींचा शोध घेणे हे मोठे आव्हान असणार आहे. या आत्महत्याप्रकरणी निमोणे गावच्या पोलिस पाटील इंदिरा बापू जाधव यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार (दि 8) फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 च्या सुमारास निमोणे येथील महीला पोलिस पाटील इंदीरा जाधव यांच्या पतीच्या मोबाईलवर गावातील हॉटेल व्यवसायीक प्रताप त्रिंबक थोरात यांनी फोन करुन सांगितले कि, शशिकांत सुदाम काळे यांच्या शेतात कामास असलेला शेतमजुर छोटु पुर्ण नाव पत्ता माहित नाही ( वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे ) याने निमोणे गावच्या हद्दीतील जालिंदर राधाकृष्ण काळे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला एका दोरीच्या साह्याने दुपारी ०१:०० वा.चे पुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा व्यक्ती काही दिवसांपुर्वी शशिकांत काळे यांच्याकडे शेतमजूर म्हणुण आला होता. या व्यक्तीकडे आधारकार्ड व कुठलेही कागदपत्रे नसल्याने तो नेमकी कुठला व कोण याबाबत कसलीही माहीती उपलब्ध नाही. त्यामुळे खुन झाल्यानंतर या व्यक्तीने आत्महत्या केल्याने परीसरात खळबळ निर्माण झाली आहे.

मनोहर शितोळे यांचा निमोणे-मोटेवाडी रस्त्यालगत खून झाल्यानंतर या शेतमजूराने फाशी घेतल्याने या दोन्ही घटनेचा परस्पर घटनेशी काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत असल्याचे शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.

1 thought on “निमोणे येथील खुनाचा तपास चालु असताना एका शेतमजुराने आत्महत्या केल्याने खळबळ

Comments are closed.