पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांकडून आर्थिक लुट

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी ३ खाजगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. ते व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडून रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी १०० रू ते २०० रू. घेत मोठा भ्रष्टाचार करत नागरीकांची मोठया प्रमाणावर आर्थिक लुट करत आहे. तरी ही पुरवठा विभाग यांना का पाठीशी घालत आहे. पैसे न दिल्यास रेशनकार्ड ऑनलाईन करत नाही. पैसे दिले का लगेच आधारकार्ड रेशन कार्डला लिंक करून मिळते.

महिन्याकाठी लाखो रुपये कमावणाऱ्या खाजगी व्यक्तीना कोण पाठींबा देतय. या खाजगी व्यक्तीना कोण पगार करत? याची चौकशी होऊन तात्काळ त्यांची हकालपट्टी करावी. अन्यथा येत्या ७ दिवसानंतर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल, असे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) अविनाश घोगरे, सुनिल जाधव यांनी सांगितले.

आमदार अशोक पवारांच्या जनता दरबारात याबाबत त्यांनी पुरवठा विभागाच्या आधिकाऱ्याला खडेबोल सूनवले असून त्यांच्यात काहीही फरक झाल्याचे दिसून येत नाही. उलट नागरीकांची लुट वाढलेली दिसुन येत आहे. याबाबत तहसिलदार बालाजी सोमवंशी काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

1 thought on “पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांकडून आर्थिक लुट

  1. खरं आहे, आम्हाला तर रेशनकार्ड ऑनलाईन करायला दोन वर्षे हेलपाटे मारावे लागले,याला कुणी तरी आवाज उठवायला हवा,खुप त्रास देत आहेत जनतेला तेथील कर्मचारी.

Comments are closed.