शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी अक्षय पवार, उपाध्यक्षपदी हेमंत गवळी, कोषाध्यक्षपदी महेश उपाध्ये यांची निवड करण्यात आली. तर संघाचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बापू रायकर यांची निवड करण्यात आली.

या मेळाव्यात शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या तहसीलदार पदावर कार्यरत असणारे सागर ढवळे यांनी शाळेतील वर्गांमध्ये फॅन बसवण्यासाठी ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली.यावेळी सरपंच गोरख पवार, माजी सरपंच बापू शिवाजी पवार, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण पवार, तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत पवार, माजी अध्यक्ष आकाश पवार, अमोल पवार, दिपक पवार, शरद पवार, सुनील पवार, राजेंद्र साबळे, विशाल गोरे, राजेंद्र पवार, सागर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
Video; शिरुर तालुक्यात जमीनीच्या ताब्याच्या वादातुन सिनेस्टाईल हाणामारी
Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर
Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही दत्तक गावातील स्मशानभुमीची दुरावस्था