रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने भिल्ल वस्तीतील मुलांसोबत धुलिवंदन

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रामलिंग येथील भिल्ल वस्ती तसेच वीटभट्टी कामगार यांच्या मुले यांच्या सोबत धुलिवंदनचा सण साजरा करण्यात आला. यावेळी या मुलांना केमिकल विरहित कोरडा रंग खेळायला देण्यात आला. यावेळी हि लहान मुलांनीही विविध रंगाचा मनसोक्त आनंद लुटला.

 

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्था नेहमीच वेगवेगळे उप्रकम राबवत असते. या मुलांना हालाकीच्या परिस्थितीमुळे कोणतेही सण साजरे करायला मिळत नाहीत. त्यामुळे या मुलांना इतर मुलांप्रमाणेच सण साजरा करुन त्याचा आनंद घेता यावा यासाठी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी हा उपक्रम राबविला.

 

यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला तसेच तुम्हाला शाळेत कोणतीही अडचण आली तर आम्हाला सांगा. मी तुमच्या सोबत आहे. तसेच सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. यानंतर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या शिरुर शहर युवती अध्यक्षा गीता आढाव व महिला उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.