Video; रांजणगाव गणपतीत मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले असून सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच शिरुर तालुक्यात उत्साहाची लाट उसळली.

रांजणगाव गणपती येथील बस स्थानक परिसरात मराठा बांधवांनी मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आंदोलकांनी आपला आनंद व्यक्त केला. “मराठा क्रांती मोर्चा की जय”, “मनोज जरांगे यांचा विजय असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला.

यावेळी अनेक गावांतील तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काहींनी एकमेकांना पेढे वाटून अभिनंदन केले. हा क्षण मराठा समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरला. यावेळी स्थानिकांनी सांगितले की, “हा आनंद केवळ आमच्या हक्काच्या विजयाचा आनंद आहे.

 

यामागे मनोज जरांगे पाटील यांचे अथक प्रयत्न आणि संपूर्ण मराठा समाजाची साथ आहे. रांजणगाव गणपतीसह शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवाळीपुर्वीच फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.