सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका; सतर्कताच आर्थिक फसवणुकीचा प्रभावी उपाय; कुमार कदम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असतानाच सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट कर्ज योजना, डिजिटल अरेस्ट आणि खोट्या गुंतवणूक योजनांचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी न पडता नागरिकांनी प्रत्येक आर्थिक व्यवहार थांबून, विचार करुन आणि खात्री करुनच करावा. सतर्कता आणि वेळेत तक्रार करणे हाच सायबर फसवणूक रोखण्याचा प्रभावी […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडा; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे चासकमान धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर पोहोचला असून, रांजणगाव गणपती परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी चासकमान धरणातून कोंढापुरी येथील तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्याचा लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील HDFC बँकेत बनावट सोने गहाण ठेवुन तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांचे गोल्ड लोन उचलत बँकेची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल 12 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एका प्लॉटिंग खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायिकाला त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या तसेच व्यवसायिकाचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या विश्वासु कर्मचाऱ्यानेच तब्बल ७१ लाख ६२ हजार ७७९ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रांजणगाव गणपती (ता. शिरुर, जि. पुणे) येथील “पृथ्वीराज उद्योग समूह” या कार्यालयात हिशोब ठेवण्याचे काम पाहणारा गणेश भिमराव थोरात […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीतील दोन विद्यमान सदस्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असुन या घडामोडीमुळे गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे. यातील एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनल मधुन निवडणुक लढवलेली आहे. रांजणगाव गणपतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षल गदादे, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदा […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथे शेतजमिनीच्या वादातून दोन व्यक्तींनी धारदार लोखंडी कोयत्याने तसेच फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करत एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, डोळ्याखाली व हातावर गंभीर इजा केली. या मारहाणीमुळे शेतकऱ्याचा डावा डोळा निकामी झाला आहे. हि घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.   याबाबत दत्तात्रय परशुराम शेलार (वय ५५, रा. […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव गणपतीत मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले असून सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच शिरुर तालुक्यात उत्साहाची लाट उसळली. रांजणगाव गणपती येथील बस स्थानक परिसरात मराठा बांधवांनी मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आंदोलकांनी आपला आनंद […]

अधिक वाचा..

Video; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का…? रांजणगाव गणपतीत लागले फलक…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मतदारसंघात आपल्या […]

अधिक वाचा..

Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त श्री क्षेत्र अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर फुलांच्या बहरात नटले आहे. तब्बल पाच टन झेंडू, गुलाब, शेवंती व विविध रंगीबेरंगी फुलांनी मंदिर, महाद्वार व परिसराची सजावट करण्यात आली असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे डोळे दिपून जात आहेत. रविवार दि २४ ऑगस्ट पासुन सुरु असलेली द्वारयात्रा गुरवार दि २८ ऑगस्ट सकाळी १० […]

अधिक वाचा..

रांजणगावच्या ४० वर्षीय तरुणाने तब्बल ६१ किमी अंतर कापत एकाच दिवसात केल्या चार द्वारयात्रा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवात १० तास आणि ३० मिनिटात तब्बल ६१. ६ किमी अंतर पार करत एकाच दिवसात महागणपतीची द्वारयात्रा करण्याचा अनोखी कामगिरी हरेश बाळासाहेब पाचुंदकर पाटील (वय ४०) यांनी केला आहे. या कामगिरीबद्दल रांजणगावसह संपुर्ण पंचक्रोशीतुन सोशल मिडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव […]

अधिक वाचा..