Dr manasi sakore

वडिलांची डॉक्टरकीची इच्छा पूर्ण करुन मानसी झाली आयआरएस!

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील नाथाभाऊ साकोरे यांची डॉक्टर होण्याची इच्छा असताना परस्थितीमुळे त्यांना डॉक्टर होता आले नाही. पण, त्यांच्या तीनही मुलांनी स्वतः डॉक्टर बनून वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करुन दाखवले. धाकटी मुलगी डॉ. मानसी साकोरे नुकतेच युपीएससीच्या भारतीय महसूल सेवेच्या (IRS) परीक्षेत यश संपादित केले आहे. यामुळे मानसी सह तिच्या कुटुंबाचे परिसरात कौतुक होत आहे.

केंदूर येथील नानाभाऊ भागुजी साकोरे हे १९८० च्या बॅचचे हायस्कूलचे विद्यार्थी त्यावेळी सर्वोत्तम गुण मिळवून इयत्ता दहावीत यशस्वी झाले होते. त्यांचे आई वडील अगदी अडाणी. त्यात घरची परिस्थिती हालाकीची. नानाभाऊंना त्याकाळी डॉक्टर व्हायचे होते. मात्र, ना कुणाचे मार्गदर्शन ना दिशा त्यांना मिळाली. पर्यायाने अभियांत्रिकीत पद्वी प्राप्त करुन ते मिलीट्री इंजिनिअरींग सर्व्हीसमध्ये रुजू झाले. त्यामुळे त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

नानाभाऊ भागुजी साकोरे यांची पहिली मुलगी डॉ. दिपीका हि एमबीबीएस झाली. डॉ. मानसी देखील बीडीएस आणि एमडीएस उत्तीर्ण झाली. तर मुलगा डॉ. जय हा देखील कोल्हापूरातून एमबीबीस झाला. मात्र त्यांनतर या भावंडांमध्ये मधवी असलेली डॉ. मानसी हीने केवळ डॉक्टर होवून थांबली नाही तर तिने मागील वर्षी युपीएससीच्या विविध परीक्षांसाठी प्रयत्न सुरू केले आणि दुसऱ्या प्रयत्नात ती भारतीय महसूल सेवेच्या ( IRS) परीक्षेत यावर्षी नुकतीच उत्तीर्ण झाली.

यशाबद्दल बोलताना आई रंजना आणि वडील नानाभाऊ यांचेसह मामा रामभाऊ शेटे यांच्यासह नातेवाईक या सर्वांनी ज्या पध्दतीने प्रेरणा दिली आणि आधार दिला त्यामुळेच मी वडीलांच्या डॉक्टरकीच्या इच्छेसह आता आयआरएस परीक्षेतही यशस्वी झाल्याचे डॉ. मानसी साकोरेने सांगितले. मानसीची मोठी बहीण डॉ. दिपीका हिचे पती कृष्णांत पाटील हे आयएएस अधिकारी असून त्यांनी मानसीला उत्तम मार्गदर्शन केल्याची माहिती साकोरे परिवाराने दिली आहे.