मुख्य बातम्या

दिलीप वळसे-पाटील आंबेगाव-शिरूरमधून लढणार अपक्ष?

शिरूर (तेजस फडके): आंबेगाव-शिरूर मतदार संघामधून दिलीप वळसे-पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांचा हात सोडून अजित पवार गटात गेले आहेत. मतदारांमध्ये याबाबत नाराजी असून, दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाकडून निवडणूक न लढता अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे, अशी माहिती खात्रीशिर सुत्रांनी दिली.

 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता. मतदारांना हे खटकले होते. यामुळे आढळराव पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली असती तरी निवडूण आले असते, असा सूर नागरिकांमध्ये त्यावेळी होता. आढळराव पाटील यांच्या पराभवानंतर वळसे पाटील यांच्यावर सुद्धा मतदारांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव डोळ्यासमोर असताना दिलीप वळसे-पाटील हे धोका पत्करण्यास तयार नाहीत. अजित पवार गटाकडून न लढता अपक्ष म्हणून लढले तर फायदा होईल, यामुळे ते आंबेगाव-शिरूरमधून अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिलीप वळसे-पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, ‘काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं, पवार साहेबांना सोडायचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना बऱ्याच आतल्या गोष्टी माहीत नसतात. पक्षाच्या 54 आमदारांची बैठक बोलावली आणि त्यात सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली. आपण सरकारमध्ये जायचं ठरलं, दुसऱ्या पक्षात नाही. आपण कोणत्या पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच आहे. अजित पवार गटात गेल्यामुळे लगेच आपण शरद पवार साहेबांचे शत्रू झालो, आणि ते आपले शत्रू झाले असे नाही. त्यांच्या बाबत प्रेम व आदर आजही आपल्यात आहे. पण विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काही भांडवल नाही, बोलायला मुद्दे नाहीत म्हणून हे भावनिक मुद्दे मांडले जातात.’

दरम्यान, आंबेगाव-शिरूर मतदार संघामधून देवदत्त निकम हे प्रबळ उमेदवार समजले जात आहेत. त्यांनी निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली असून, नागरिकांना त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Loading ...

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

‘ती’ बातमी निराधार आणि खोडसाळ : दिलीप वळसे-पाटील

दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

दिलीप वळसे पाटील यांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार? शरद पवार म्हणाले…

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

अजित पवार यांना धक्का! दिलीप वळसे पाटील परतीच्या मार्गावर…

दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चांना उधाण…

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago