Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

मुख्य बातम्या राजकीय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्याचे राजकारण एकेकाळी दर्जा, संयम आणि सुसंस्कृततेचे प्रतीक मानले जात होते. माजी मंत्री स्व. बापूसाहेब थिटे, स्व. रावसाहेब पवार, लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे, काकासाहेब पलांडे, पोपटराव गावडे, आणि अशोक पवार यांसारख्या नेत्यांनी विरोधकांनाही आपलेसे करत संवाद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या संस्कृतीला जपले. मात्र काही नेत्यांनी सध्या सुडाच राजकारण करत कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचं काम चालु केल्याने ‘भारतीय जनता पार्टी’ मध्ये प्रवेश केल्याचे शेखर पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना पाचुंदकर म्हणाले, या दिग्गजांच्या कार्यकाळात शेतीला पाणी, औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी आणि तालुक्याला साधनसंपन्नतेचा नवा चेहरा मिळाला. मात्र, आज हेच राजकारण संवादाऐवजी सूड आणि सन्मानाऐवजी अहंकाराच्या वाटेवर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षात स्वतःच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, दबाव आणणे, त्रास देणे या प्रकारांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष वाढला आहे. आत्मपरीक्षण करण्याऐवजी बदला घेण्याचं राजकारण सुरु झालं आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

शिरुर तालुक्यात आजही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित, पाबळ आणि त्याबारा गावातील पाणीटंचाई गंभीर, बिबट्याचा उपद्रव वाढता, तर शेतीसाठी वीजपुरवठा अपुरा आहे. औद्योगिक क्षेत्र असतानाही कामगारांचे प्रश्न न सोडवलेले, तर ग्रामीण भागात विकासाचे स्वप्न अजूनही अपुरेच आहे. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून काही मंडळी राजकीय सुड भावनेने चुकीचे निर्णय घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भाजपमध्ये प्रवेश करुन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पाचुंदकर यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या माध्यमातून आता दबलेले, त्रासलेले आणि अन्याय सहन करणारे कार्यकर्ते एकत्र येऊन तालुक्याच्या जनतेचे खरे प्रश्न मांडणार आहेत. “शिरुरचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुन्हा जिवंत करणे आणि अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे पाचुंदकर यांनी ठामपणे सांगितले. यावेळी माजी जिल्हा जिल्हा परीषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनीही यावेळी भाजपा मध्ये प्रवेश केला.

शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही दत्तक; गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत