धर्मपरीवर्तणासाठी बेट भागात वाढत चाललाय गंभीर प्रकार…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

फाकटे गावातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरुर) येथे गायरान गट नं १११ मध्ये २०२० पासून अतिक्रमण करुन एक बांधकाम केले आहे. फाकटे हे गाव श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे. तेथे जाणून बाजून बाहेरील लोकांनी हे अतिक्रमण करण्यासाठी गरीब लोकांना बळी पाडून तेथे बांधकाम केले आहे. त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना मोठया प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत.

भविष्यात एखादी मोठी घटना घडू शकते. शिवाय, स्थानिक हिंदू नागरिकांना त्यांच्या कार्यक्रमाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तेथील बांधकाम तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी जालिंधर बाळू राळे व गोरक्षकारभारी ढमाले यांनी लेखी निवेदनाद्वारे फाकटे ग्रामपंचायतीकडे केली आहे. तसेच पोलिस प्रशाससाने तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

धर्म प्रसाराच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे प्रकार बेट भागात वाढत चालले असून ही गंभीर बाब असून सर्व नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) तालुका प्रमुख गणेश जामदार यांनी केले आहे.