Shirur Police Station

अपमानित करणारी पोस्ट टाकल्याच जाब विचारल्याने सरपंच महिलेसह नातेवाईकांना मारहाण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) इनामगाव (ता. शिरुर) येथील ऊपसरंपच सिध्देश्वर शिवाजी नांद्रे याने व्हाट्सअप ला अपमानित करणारी पोस्ट टाकल्याने त्याबाबत सरपंच महिला हिने विचारणा केल्याने तिला शिवीगाळ धक्काबुक्की केली. हे भांडण सोडवायला आलेल्या तिच्या पतीला, वडीलांना, दीराला तसेच भावाला लाथाबुक्यांनी व काठीने नांद्रे व त्याच्या सोबत असणाऱ्या इसमांनी मारहाण केली असून ग्रामपंचायतीच्या कपाटाचे, खिडकी दरवाजे फोडून शासकिय मालमत्तेचे नुकसान केले आहे. या प्रकरणी  शिरुर पोलिस स्टेशनला परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की (दि ५) मे रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास इनामगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा संपण्यापूर्वी महीला सरपंच यांनी नियमांप्रमाणे ऐनवेळीच्या विषयात विषय काढुन उपसरपंच सिध्देश्वर शिवाजी नांद्रे (रा. इनामगाव ता. शिरुर, जि. पुणे) यांना व्हॉटसअप ग्रुपचे सर्व मेंबर हजर असतांना तिने व्हॉटसअप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टवर तिला उद्देशून अपमानित करणारी पोस्ट उपसरपंच नांद्रे यांनी टाकली. त्याबाबत तिने विचारणा केली असता त्याने ‘मला तु ‘कोण विचारणारी,’ असे बोलून अरेरावीचे भाषेत मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

त्यावेळी महीलेचे पती संजय घाडगे, सुरेश मचाले, दिर बाळासाहेब घाडगे, दिर प्रविण घाडगे, दिर राजेंद्र घाडगे असे सोडवायला आले असतांना १) सिध्देश्वर शिवाजी नांद्रे याने व त्याच्यासोबत आलेले बाहेरील गावातील  २) शरद शिवाजी नांद्रे, ३) सागर सुदाम नांद्रे, ४) स्वप्नील सुदाम नांद्रे, ५) किशोर संभाजी नांद्रे, ६) अक्षय शांताराम नांद्रे, ७) अभिषेक उत्तम नांद्रे, ८) ओमकार संतोष नांद्रे, ९) प्रतीक संतोष नांद्रे, सर्व रा. गणेगाव दुमाला व इनामगांव ता. शिरूर  या सर्वांनी गर्दी जमाव जमवुन सिध्देश्वर नांद्रे याने कपडयामध्ये दगड बांधुन राजेंद्र लालासो घाडगे यांना मारहाण केली.

तसेच वरील इसमांनी लाथाबुक्यांनी त्यांच्या पाठी व पोटावर मारहाण केली. या मारहाणीत त्यांना डोक्याला, पोटाला दुखापत झाली. सुरेश मचाले यांच्या उजव्या गुडघ्याला मार लागल्याने सुजुन दुखापत झाली. तसेच बाळासाहेब घाडगे यांचे डोळ्यावर काठीने मारल्याने दुखापत झाली. तसेच उपसरपंच सिद्धेश्वर नांद्रे यांनी सर्वाना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच त्या सर्वानी ग्रामपंचायतीचे ग्रील दरवाजाची तोडफोड, कपाटाची तोडफोड, खिडकी फोडून अंदाजे ६० हजार रुपयाचे शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे, तसेच भांडणादरम्यान तेथे असलेल्या मूर्तीच्या शोकेशच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. याबाबत महीला सरंपच यांचे पती संजय घाडगे यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव करत आहेत.