पचनशक्ती, हार्ट, डोळे आणि केसांसाठी गाजर लाभदायक

आरोग्य

बहुतांश लोक गाजर कधीतरी खातात. परंतु, गाजर नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे अनेकांना माहिती नसते. प्रदूषीत वातावरणामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून गाजर आपले रक्षण करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. हृदय, त्वचा, केसगळती, डोळे, पचनशक्ती, अ‍ॅसिडिटी, कँसर अशा आजारात गाजर लाभदायक आहे.

हे आहेत फायदे

1) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर असल्याने केस मजबूत होतात. यामुळे केसगळती थांबते. यासाठी रोज गाजराचा ज्यूस प्यावा.

2) दातांच्या आरोग्यासाठी गाजार खुप उपयुक्त आहे. यामुळे हिरड्या स्वच्छ होतात. प्लाकची समस्या होत नाही. कॅव्हिटी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.

3) गाजर हृदयरोगाच्या रूग्णांसह उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी सुद्धा लाभदायक आहे. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. मानसिक ताण कमी होतो. रोग प्रतिकारकशक्ती वाढते. यामुळे अनेक आजार दूर राहतात.

4) निरोगी डोळ्यांसाठी गाजर लाभदायक आहे. यामुळे दृष्टी चांगली होते.

5) गाजर सेवन केल्याने कँसर दूर होऊ शकतो. कारण यात पॉली-अ‍ॅसिटिलीन, अँटीऑक्सीडेंट व फालकॅरिनोल भरपूर असते.

6) गाजर सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते. बद्धकोष्ठता, अपचनाचा त्रास दूर होतो.

7) उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

8) त्वचा चमकदार होते.

9) यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.

1०) मधुमेहाच्या रूग्णांसाठी गाजर वरदान आहे. यातील बीटा-कॅरोटीन तत्वामुळे मधुमेहाची शक्यता कमी होते.

(सोशल मीडियावरून साभार)