मखाणा म्हणजे कमळाच्या बिया. या बिया फारच पोषणयुक्त असतात. मखाणा पासून अनेक रेसिपी बनवल्या जातात. पण अनेकजण मखाणा भाजून खातात. मखाणा हे पोषक तत्वांचे भांडार आहे. यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह मोठ्या प्रमाणात असते. मखाणा रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तदाब सारख्या अनेक समस्या दूर होतात. हाडे मजबूत करण्यासाठी मखाणा फायदेशीर आहे. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम देखील करते.
वजन कमी करण्यास मदत करते: जर वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी मखणा खावे. यामध्ये फॅट आणि कॅलरीज कमी असतात, या शिवाय फायबर भरपूर असते. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते. यामुळे भूक लागत नाही.
हाडे मजबूत बनवते: मखाणा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. तसेच हाडांच्या संबधित समस्या दूर होतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते: मखाणा खाण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. शरीराला अनेक प्रकारच्या आजारा पासून वाचवण्याचे काम मखाणा करते.
रक्तातील साखरेवर नियंत्रण करते: मखाणा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मखाणा खावा.
पचनक्रिया सुधारते: मखाणा खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. यात मुबलक प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया मजबूत करण्याचे काम करते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्या दूर होतात.
(सोशल मीडियावरूर साभार)