फक्त दिवसातून एक लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते का

आरोग्य

जेव्हा तुम्ही दिवसातून फक्त एक लिटर पाणी पिता तेव्हा शरीरात कोणते बदल होतात

१) एक्स्ट्रासेल्युलर फ्लुईड व्हॉल्यूममध्ये घट: पाण्याचे कमी सेवन केल्याने बाह्य द्रवपदार्थात घट होते, ज्यामुळे त्वचा घट्ट दिसते आणि स्नायू अधिक स्पष्ट दिसू लागतात. हा एक तात्पुरता प्रभाव आहे. बहुतेकदा शरीरसौष्ठवपटू आणि अभिनेते फोटोशूट किंवा स्पर्धांपूर्वी या स्थितीचा उपयोग करून घेतात.

२) इंट्रासेल्युलर फ्लुईड संकोचन आणि सेल्युलर स्ट्रेस (ताण): दीर्घकाळापर्यंत निर्जलीकरणामुळे पेशींमधील पाणी कमी होते आणि चयापचय कार्य, स्नायूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

३) इलेक्ट्रोलाईटचे असंतुलन: सोडियम, पोटॅशियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन विस्कळित होते, ज्यामुळे स्नायूंमध्ये पेटके, कमकुवतपणा, चक्कर येणे व हृदयाशी संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात.

४) कॉम्प्रोमाइज्ड हायड्रेशन लेव्हल्स: शरीर व्हॅसोप्रेसिनसारख्या संप्रेरकांद्वारे हायड्रेशनचे नियमन करते, जे द्रव पातळी कमी असताना पाण्याची पातळी वाढवतात. तर क्रॉनिक डिहायड्रेशनमुळे मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)