१) पाणी पिण्यासाठी फ्रीज मधी गार पाणी न पिता माठाचा उपयोग करावा.
२) माठात वाळा , मोगर्याची फुले ,गुलाब पाकळ्या घालून ठेवावे. त्याने पाणी ही सुगंधित होते. थंडावा ही मिळतो. आणि उन्हाळ्यात भरपूर पाणी पिले पाहिजे.असे हे पाणी पिले ही जाते.
३) १ लिटर पाण्यात १ चमचा सब्जा ४_५ तास आधी घालून ठेवा म्हणजे सब्जा चांगला फुगून येतो..ह्या पाण्याने उष्णता कमी करण्यास मदत होते.
४) तुळशी ची बी म्हणजेच तुकुमराई हे सुध्दा असेच पाण्यात भिजऊन पाणी प्याल्याने बराच थंडावा मिळतो.
५) आवला सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबत तसेच रोज जेवणात ताक, मठ्ठा असे घ्यावे.
६) रोज रात्री १ चमचा धणे आणि १/२ चमचा जिरे, आणि पाव चमचा बडीशोप हे पाण्यात रात्री झोपताना भिजत घालून ते गरम करून झाकून ठेवून द्यावे.सकाळी चहा ऐवजी हा काढा गाळून प्यावा.उष्णता कमी होण्यास मदत मिळते.
७) रोज १ चमचा गुलकंद खावे.
८) कलिंगड,खरबूज अशी फळे खावीत…
फ्रीज मधील पाणी, थंडगार जुस, बर्फाचा वापर ह्याने उष्णता कमी करण्या ऐवजी वाढत राहील. तेवढ्या पुरते गार पिण्यास खूप छान वाटते.
(सोशल मीडियावरून साभार)