रिकाम्या पोटी चावून खा ‘ही’ ५ हिरवी पानं, पित्ताचा त्रास होईल कमी- दुर्गंधीही येणार नाही

आरोग्य

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सतत जंकफूड, पुरेशी झोप न घेणे, ताणतणाव आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी आपली पचनक्रिया खराब होऊन अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते.

आम्लपित्ताचा त्रास वाढतो. अरबट-चरबट पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष निर्माण होतो. पित्ताचा त्रास वाढला की डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, आंबट पाणी, उलट्या होणे आणि अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या वाढतात. अशावेळी काही घरगुती उपाय केल्याने पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो.

आपल्या रिकाम्या पोटी ५ पुदिन्याची पाने खावी लागतील. पुदिन्याची पाने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामध्ये असणारे घटक पचन सुधारण्यास, डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात. तसेच तोंडाची दुर्गंधी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. पुदिन्यामध्ये ऍलर्जी-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे ऍलर्जीची लक्षणे कमी होतात.

पुदिन्याची पाने खाताना त्यामध्ये चण्याऐवढा भिमसेन कापूर घालून ५ पाने चघळून खावी. किंवा या पानांसोबत खडीसाखर खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. वारंवार त्रास देणाऱ्या पित्ताच्या त्रासकडे दुर्लक्ष करु नका कारण समस्या गंभीर होऊन आजार वाढू शकतो. अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास होत असेल तर हा उपाय करुन पाहा.

पुदिन्याची पाने खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच पुदिन्याची पाने पाण्यात उकळून त्यात मध किंवा लिंबू घालून त्याचा चहा प्या. इतकेच नाही तर पुदिन्याची पाने पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्या. जेवणात पुदिन्याची चटणी था. असं केल्याने आपल्याला पित्ताच्या त्रासापासून आराम मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत