कमी तापमान, हवेतील प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाचा दाह होतो.यामुळे नाकातून पाणी, शिंका,कफयुक्त खोकला सुरू होतो. कधी कधी छातीत खूप कफ असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही खोकून खोकून बरगडय़ा- पोटा त दुखायला लागते. म्हणूनच काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे कफपासून सहज सुटका मिळू शकते.
लिंबू: लिंबामध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. लिंबा मुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी, कफची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.
लसूण: आहारातील अतिशय महत्त्वाचा पदार्थ. लसणामध्ये असणारे गुण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे सर्दी- खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर आहारात लसूण आवर्जून वापरा.
आले: आल्यात अनेक उपयु क्त गुणधर्म असतात जे कफ, सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
गुळण्या करणे: हा घसा, सर्दी, कफासाठी एक उत्तम उपाय आहे गरम पाण्यात मीठ ,हळद टाकून गुळण्या केल्यास घशाचा संसर्ग लवकर बरा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)