कोरडा खोकला घरगुती उपाय 

आरोग्य

हा सर्दी, पाऊस, वसंत किंवा कुठल्याही मोसमात होते. या प्रकारच्या खोकल्यात कफ नसतो, फक्त घसा कोरडा पडतो व खोकला येतो. याचा घरगुती उपाय ह्या प्रकारे आहे.

उपाय

गायीच्या दुधाचे तूप 15-20 ग्रॅम व 1 0-12 काळे मिरे घेऊन एका वाटीत गरम करत ठेवावे. जेव्हा काळे मिरे फुटायला लागतील तेव्हा गॅस वरून खाली उतरून घ्यावे व थोडे थंड करून त्यात 20 ग्रॅम खडी साखर वाटून मिक्स करावी व काळे मिरे खाण्यास द्यावे. याचे सेवन केल्यानंतर एक तास काही खायला प्यायला नाही पाहिजे. हे एक-दोन दिवस सतत घ्यावे, ज्याने कोरडा खोकला ठीक होईल. कोरड्या खोकल्यात हळदीचे सेवन सुद्धा लाभदायक असते.

(सोशल मीडियावरून साभार)