मोरिंगाची चटणी
शेवग्याच्या पानांपासून चविष्ट अशी चटणी बनवली जाऊ शकते. यासाठी सर्व प्रथम शेवग्याची पाने थोडीशी सुकवून घ्या. मग ही पाने तेलात टाका. ढवळत यांना कुरकुरीत शिजवून घ्या.आता एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, थोडे हरभरे, उडीद डाळ, खोबरे, थोडी चिंच टाकून शिजवून घ्या. मग यात मीठ टाका. आता हे तयार मिश्रण मिक्सर मध्ये बारीक करा आणि तयार चटणी खाण्यासाठी सर्व्ह करा.
मोरिंगचा पराठा
सकाळच्या नाश्त्याला मोरिंगचा पौष्टिक पराठा बनवू शकता. यासाठी मोरिंगाच्या शेंगा उकडून हाताने मॅश करा. यात आवडीनुसार मसाले टाका आणि स्टफिंग तयार करा. यानंतर गव्हाचे पीठ मळून एक गोळा घ्या आणि यात तयार स्टफिंग भरून याचा पराठा लाटून घ्या. तयार पराठा तव्यावर खरपुस भाजा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
मोरिंगाच्या पानांचा ज्यूस
मोरिंगा पानांचा रस, जो औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, तो देखील तयार करून पिला जाऊ शकतो. चवीसाठी यात थोडेसे रॉक सॉल्ट घालू शकता. हे पचनक्रिया सुधारते आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा आणि केसांची वाढही सुधारेल.
मोरिंगा पराठा
यासाठी एका मोठ्या वाडग्यात गव्हाचे पीठ, बेसन पीठ, दही, हळद, लाल तिखट चटणी, तीळ, ओवा, मीठ, हिंग मिक्स करून घ्या. यानंतर यात लसूण, जिरे, मिरची, आल्याची पेस्ट, कोवळी शेवग्याची पाने स्वछ करून टाका आणि व्यवस्थित पीठ मळून घ्या. तयार पिठाचे पराठे लाटा आणि पॅनवर खरपूस भाजून घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)