मेष: स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. रखडलेले प्रोजेक्ट मार्गी लागतील. डिजिटल मार्केटिंग किंवा ब्रँडिंग क्षेत्रात नवीन संधी मिळतील. घरातील शुभ कार्यावर खर्च वाढेल.
वृषभ: करिअरमध्ये नशिबाची साथ लाभेल. कायदेशीर बाबतीत यशाची शक्यता आहे. मानसिक ताण टाळा. फायनान्स, बँकिंग क्षेत्रात लाभाचे संकेत. दुपारनंतर कामाचा वेग वाढेल.
मिथुन: कामाचा ताण वाढेल, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. मीडिया, कम्युनिकेशन किंवा पॉडकास्टिंग क्षेत्रात उत्तम संधी मिळतील. सर्जनशील कामांचे कौतुक होईल. नवीन प्रोजेक्टची सुरुवात होऊ शकते.
कर्क: व्यवसायात नवीन डिल होण्याची शक्यता. अर्धवट कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. रिअल इस्टेट क्षेत्रात कामाचा वेग कमी राहील पण नुकसान टळेल.
सिंह: दिवसभर व्यस्तता राहील. मॅनेजमेंट किंवा प्रशासन क्षेत्रात प्रमोशनचा योग. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वरिष्ठांशी वाद टाळा.
कन्या: छोट्या चुका मोठे नुकसान करू शकतात, त्यामुळे सावध राहा. अकाउंटिंग, ऑडिट किंवा डेटा क्वालिटी क्षेत्रात यश. नवीन डिल करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा.
तूळ: करिअरमध्ये सन्मान आणि यश. अडथळे दूर होतील. फॅशन किंवा डिझाइन क्षेत्रात मागणी वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत कायदेशीर सल्ला घ्या.
वृश्चिक: आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल. रिसर्च किंवा डेटा अॅनालिसिस क्षेत्रात नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण.
धनु: व्यवसायात जोखीम घेतल्यास फायदा होईल. नव्या योजना यशस्वी ठरतील. शिक्षण किंवा ट्रेनिंग क्षेत्रात स्थिरता राहील. तब्येतीकडे लक्ष द्या.
मकर:भागीदारीत व्यवसायात नफा. नवीन प्रस्ताव येतील. फ्रिलान्सर्सना चांगल्या संधी मिळतील. इंडस्ट्रियल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता.
कुंभ: करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. आयटी, टेक्नॉलॉजी किंवा एआय क्षेत्रात कामाचा ताण वाढेल. निर्णय विचारपूर्वक घ्या. धनलाभ होण्याची शक्यता.
मीन: बोलण्याच्या प्रभावामुळे कामे पूर्ण होतील. आरोग्यसेवा किंवा वेलनेस क्षेत्रात नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. सहकाऱ्यांची मदत मिळेल.