हमारे बच्चों को नशे की लत से बाहर निकाले…

आरोग्य

मुंबई: काल गोवंडीत प्रचारासाठी असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नवाब मलिक यांच्याकडे गोवंडीतील अनेक महिलांनी आपल्या मुलांना नशेतून बाहेर काढण्यासाठी आर्त हाक घातली. आमची मुलं नशेत आपलं आयुष्य बरबाद करत असून कुटुंब संपायला लागल्याची बाब नवाब मलिक यांच्या निदर्शनास त्या महिलांनी आणून दिली. शिवाय आमच्या मुलांना वाचवा, अशी विनवणीही या महिला करताना दिसल्या.

ड्रग्जच्या विळख्यात इथले तरुण अडकले असून गोवंडीला नशेपासून मुक्त करा अशी मागणीही या महिलांनी केली. “हमारे बच्चे नशे की लत में डूबे हुए हैं। त्यामुळे कुटूंबाचा आनंद संपला आहे. याशिवाय समाजातील पतही संपायला लागली आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मुलांना वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही केली.

यावेळी नवाब मलिक यांनी गोवंडीला नशामुक्त केल्याशिवाय थांबणार नाही. त्यासाठी एक प्रभावी योजना बनवली जाईल असा शब्द त्या महिलांना दिला. दरम्यान नशामुक्त गोवंडी करण्यासाठी सरकारसोबतच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.