डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी, फायदे वाचाल तर…

आरोग्य

१) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर:- पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. कारण यात अल्फा लिपोइक अॅसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं.

२) एनर्जी मिळते:- पालकमध्ये फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि याद्वारे शरीराचा थकवा दूर करण्यास मदत मिळते.

३) डोळ्यांसाठी फायदेशीर:- पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि लूटिनसारखे महत्वाचे न्यूट्रिएंट्स असतात. जे डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

४) हाडे होतात मजबूत:- पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. हाडांसंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो.

५) आतड्यांसाठी फायदेशीर:- पालक भाजीमध्ये फायबर भरपूर असतं. जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. सोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

६) त्वचेसाठी फायदेशीर:- पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. या तत्वांमुळे त्वचा चमकदार दिसते.

७) वजन नियंत्रित राहत:- पालक भाजीमध्ये कॅलरी कमी असतात. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांच्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते.

८) हृदयासाठी फायदेशीर:- पालकमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं, जे हृदयासाठी फायदेशीर असतं. याने हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो.

९) मानसिक आरोग्य चांगल राहत:- पालक भाजीमध्ये फोलेट असतं, जे डिप्रेशन आणि स्ट्रेस लेव्हल कमी करण्यास मदत करतं.

१०) डिटॉक्सिफिकेशन:- पालक भाजीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

(सोशल मीडियावरून साभार)