शिरुर तालुक्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांची चिंता वाढली

कान्हूर मेसाई (सुनील जिते) शिरुर तालुक्यात आज मंगळवार (दि 9) रोजी दुपारच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाला सुरूवात झाली. नंतर मात्र सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. तसेच हवेमध्ये कमालीचा गारठा वाढून धुकेही जमा झाले. आज दिवसभर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, धुके व हवेतील गारवा याचा शिरुर तालुक्यातील पिकांसह फळबागांना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने विद्युत तारा व खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

शिरुर (तेजस फडके): शिरुर परीसरात काल गुरुवार (दि. 8) रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. सोने सांगवी, ढोकसांगवी, रांजणगाव, कारेगाव, फलके मळा, करंजावणे, गणेगाव परिसरात पावसाबरोबरचं वाऱ्यांचा जोर खुप होता. याबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सांगितले की विजेचे खांब पडल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शिरुर तालुक्यात सूरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे […]

अधिक वाचा..

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावा…

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालाव, अशी मागणी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारांच्या बैठकीत केली. शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी, शिवसंस्कार सृष्टी अशा महत्वाच्या प्रलंबित विषयावर चर्चा करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे मागील काही […]

अधिक वाचा..

Video: कारेगाव येथे ढगफुटी सदृश पाऊस; पुणे-नगर महामार्ग पाण्यात…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 18) रोजी सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कारेगाव तसेच फलके मळा येथे पाऊसाचे पाणी मोठया प्रमाणात रस्त्यावर वाहून आल्याने पुणे-नगर महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुक कोंडी झाली. परंतु रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे ट्राफिक पोलिस, होमगार्ड आणि स्थानिक युवकांनी रात्री उशिरापर्यंत वाहत्या […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात ‘हा’ चहा आरोग्यास फायदेशीर

पाऊस आला कि, चहाप्रेमींसह सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र पावसाळ्यात चहासोबत काही गुणकारी आणि औषधी गोष्टी टाकल्यास साथीच्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. १) चहामध्ये आले किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहतात. २) आले आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरल्याने शरीराला आराम मिळतो. तसेच पचनक्रिया […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात सापांच्या प्रजननामुळे काळजी घेणे गरजेचे

शिक्रापूर: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना सापांच्या प्रजननाचा देखील काळ असल्याने घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले घराच्या आजूबाजूला आलेली असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. सध्या सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने सापांच्या पिल्लांचा जन्म झालेला असून पाण्यामुळे सापांना निवारा नसल्यामुळे सापांसह सापाची पिल्ले निवाऱ्याच्या […]

अधिक वाचा..
dimbe dam

सावधान! डिंभे धरण ९३ टक्के भरले…

घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी… सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर, आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज (गुरुवार) ९३ टक्के भरले आहे. दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून २५२० पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण […]

अधिक वाचा..
pimperkhed rain

विडिओ: पिंपरखेड मध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस….

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दिवसभर उन्हाचा मोठा तडाखा, प्रचंड उकाड्यामुळे पिंपरखेड व परिसर त्रस्त होता… संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. व परिसर जलमय झाला. ग्रामस्थ ही निवांत झाले… परंतु रात्री साडेतीन च्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र हा पाऊस वेगळेच चिन्ह दाखवत होता…. थांबतही नव्हता उलट जोर वाढत गेला….. सकाळी साडेपाच च्या सुमारास पावसाने उसंत […]

अधिक वाचा..
Eknath Shinde and Nathabhau Shewela

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या: नाथाभाऊ शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडे, […]

अधिक वाचा..

Video: कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग गेला खड्डयात…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेले आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे कारेगाव येथील मुख्य चौकात गटार लाईन नसल्याने पाणी साठत आहे. पुणे-नगर महामार्गाला मोठया प्रमाणात खड्डे पडले असून, रात्रीच्या वेळेस याठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यात हि समस्या निर्माण होत असल्याने रोडच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटवून या ठिकाणी गटार लाईन करण्यात यावी, अशी मागणी […]

अधिक वाचा..