१) तुम्ही आडव्या, झोपलेल्या स्थितीत असाल तर जळजळ वाढते. बसा किंवा उभे रहा. काही पावले चाला. तुम्हाला आराम वाटेल.
२) थंड दूध पिल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्यात वाटीमध्ये दूध ठेवावे. लगेच थंड होते.
३) बेकिंग सोड्याचा वापर करून जळजळ कमी होऊ शकते. एका ग्लास मध्ये अर्धा ते एक चमचा बेकिंग सोडा टाकून ते पाणी प्या. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. हा उपाय सारखा सारखा करू नये. जास्त सोडा खाणे योग्य नाही.
४) भरपूर पाणी पिणे हा साधा उपाय करून पहा. दररोज तीन-चार लिटर पाणी प्या. पाणी नेहमी घोट घोट, सावकाश प्या. यामुळे तोंडातील लाळ पोटात जाईल. लाळ अल्कालाईन असते. आपल्या खाण्यामुळे पोटात ॲसिडीटी निर्माण होते. लाळ पोटात गेल्यास पोटात ॲसिड व अल्कली न्युट्रालाईझ होतात. ॲसिडीटीचा त्रास कमी होतो.
५) तुम्हाला नेहमी जळजळ होत असेल तर, जेवण झाल्यानंतर गुळ खा. गुळाचा खडा तोंडात ठेवा. तो हळूहळू विरघळू द्या. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल.
6) आहारात टोमॅटो व इतर सलाड याचा समावेश करा. फळे, विशेषतः केळी खा. केळी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. असा आहार खूप फायदेशीर आहे. यामुळे एसिडीटी आणि पोटाची जळजळ या समस्या रहाणार नाहीत.
७) तुळशीच्या पानांचा रस फायदेशीर ठरतो. तुळशीची चार-पाच पाने चावून चावून खाल्ली तरी चालतील.
८) आल्याचा रस पोटातील जळजळ दूर करतो. लिंबाचा रस, मध आणि आल्याचा रस पाण्यात एकत्र करुन प्या. याने पोट शांत होईल. आल्यामध्ये अॅंटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.
९) ओवा गरम करून त्याची पावडर तयार करा. त्यामध्ये सैधव मीठ मिसळा. हे मिश्रण जेवणानंतर गरम पाण्यातून घ्या. एसिडीटी दूर होते. आहारात दालचिनीचा समावेश करा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.
(सोशल मीडियावरुन साभार)