१) रोज रात्री ६-७ बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.
२) गाजरामध्ये अ, ब, क जीवनसत्वन असतात, त्यामुळे रोज गाजर खाल्यास किंवा गाजराचा ज्यूस प्यायल्यास नजर तीक्ष्ण होते.
३) रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्याच पाण्याने डोळे धुवावेत.
४) रोज रात्री झोपतांना मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी.
५) एक चमचा बडीशेप, दोन बदाम, अर्धा चमचा खडीसाखर एकत्रित करून वाटून घ्यावं. हे वाटण रोज रात्री झोपतांना दुधासोबत घ्यावे.
६) ३-४ हिरव्या वेलच्या, एक चमचा बडिशेप सोबत वाटून घ्याव्या. हे वाटण रोज रात्री झोपतांना दुधासोबत घ्यावे.
७) ग्रीन टी दिवसातून रोज २ ते ३ वेळा प्यावा. यातील अँटिआँक्सिडंटस् डोळ्यांना आरोग्य प्रदान करतात.
८) दिवसातून दोन वेळा मोरावळा (आवळ्याचा मुरंबा) खावा. याने नजर चांगली होते, चष्मा सुटतो.
९) रोज एक चमचा ज्येष्ठमध पावडर, मध, अर्धा चमचा तूप एकत्रित करून सकाळ संध्याकाळ दूधासोबत घ्यावं.
१०) डोळ्यांच्या चारही बाजूंनी अक्रोडाच्या तेलाने मालिश करावी, त्यामुळे फायदा होतो.
११) रोज सकाळी १ ते २ किलोमीटर अंतर हिरव्यागार गवतावर अनवाणी चालावे, त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
१२) रोज रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरुन ठेवावे. सकाळी उठल्यावर १ ते २ ग्लास पाणी अनश्या पोटी प्यावे.
१३) रोजच्या आहारात हिरव्यागार पालेभाज्या खाव्यात, डोळ्याना फायदा होतो.
१४) दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करावा.
१५) जिरे व खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन हे वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्यावे.
१६) सूर्यफूलांच्या बियांच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. या बियांत जीवनसत्व क, ई, बिटा कँरोटिन व अँटिआँक्सिडंटस् असतात. हे डोळ्यांसाठी लाभदायक आहेत.
१७) सकाळी उठून तोंडात पाणी धरून ठेवावे. व डोळ्यांवर सामान्य थंड पाण्याचा हबका द्यावा. याने डोळ्यांची दृष्टी तेज होते, चष्मा लागत नाही.
१८) डोळ्यांची होणारी जळजळ थांबवण्यासाठी रोज रात्री झोपताना डोळ्यात गुलाबपाणी टाकावे, याने डोळ्यांना थंडावा मिळतो.
१९) डोळ्यांच्या होणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी दालचिनिचा चहा प्यावा, याने नसांत येणारा तणाव दूर होतो.
२०) एक चमचा ताजे लोणी व काळे मिरे पूड एकत्र करून खावे. यावर २-३ कच्च्या नारळाचे तुकडे खावेत. असे दोन-तीन महिने केल्यास चष्मा कायमचा सुटतो नि डोळे तजेलदार होतात.
2१) शतावरी, ज्येष्ठमध, त्रिफळा ह्या वनस्पतीचा वापर कायम करावा.
(सोशल मीडियावरून साभार)