मधमाशी चावली तर चटकन करा हे ३ उपाय

आरोग्य

मधमाशीने डंक मारल्यावर विष त्वचेमध्ये प्रवेश करतं आणि त्यामुळे सूज, लालसरपणा, जळजळ आणि दुखणे सुरू होते. त्यामुळे अशावेळी तात्काळ योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मधमाशीने डंक मारल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असतेच. परंतु आपण मधमाशी चावल्यांनंतर तात्काळ काही प्रथमोपचार घरच्याघरीच करु शकतो. काही सोप्या घरगुती उपायांनी या वेदना कमी करता येतात तसेच विष शरीरात पसरू नये यासाठी प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे असते. मधमाशी चावल्यावर तात्काळ काय करावे जेणेकरून त्रास कमी होईल आणि धोका टाळता येईल ते पाहूयात.

मधमाशी चावल्यानंतर प्रथमोपचार म्हणून नेमक काय कराव

मधमाशीने डंक मारल्यानंतर सर्वातआधी ताबडतोब त्या ठिकाणी नखांनी किंवा कोणत्याही सपाट वस्तूने (जसे की कार्ड, पट्टी इ.) हळूवार घासून मधमाशीचा डंक काढून टाका. त्यामुळे डंक त्वचेत खोलवर शिरुन विष पसरण्याची शक्यता कमी होते. डंक काढल्यानंतर त्वचेचा तो भाग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि पुसून कोरडा करा. त्यानंतर सूज व वेदना कमी करण्यासाठी इतर घरगुती उपायांचा आपण वापर करु शकतो.

१) ॲप्पल सायडर व्हिनेगर: ॲप्पल सायडर व्हिनेगर हे मधमाशीच्या विषाचे परिणाम कमी करण्यास उपयुक्त मानले जाते. हे त्वचेला थंडावा देऊन सूज व जळजळ कमी करते तसेच वेदनांपासून आराम मिळवून देते. यासाठी एका टबमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात थोडेसे ॲप्पल सायडर व्हिनेगर मिसळा. त्यानंतर मधमाशीने चावलेला भाग या पाण्यात सुमारे १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे त्वचेवरील सूज, खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल.

२) बेकिंग सोडा: बेकिंग सोडा देखील मधमाशीच्या चाव्यामुळे होणारी सूज, जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. यासाठी थोडंसा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मधमाशीने चावलेल्या भागावर लावा आणि सुमारे १५ मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. यामुळे मधमाशीने चावलेल्या भागावरील परिणाम कमी होईल, खाज थांबेल आणि त्वचेला आराम मिळेल.

३) टूथपेस्ट: मधमाशीने चावलेल्या भागावर टूथपेस्ट लावणे हा देखील एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. टूथपेस्टमध्ये असणारे अल्कधर्मी (Alkaline) घटक मधमाशीच्या विषाचे प्रभाव कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे सूज, जळजळ आणि खाज कमी होते. यासाठी मधमाशीने चावलेल्या त्वचेवर थोडीशी टूथपेस्ट लावा आणि काहीवेळ तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. यामुळे त्वचेला आराम मिळेल आणि त्रास कमी होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत