चाळशीनंतरच्या प्रौड महिलांमध्ये होणारा थायराइड ग्रंथींचा आजार आहे. थायरॉईड ही एक ग्रंथी असून तिचा आकार फुलपाखरा सारखा असतो, आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचे मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे.
आयोडीनची कमी, टाईप-1 मधूमेह, वारंवार गर्भपात होणे, वंध्यत्व, औषधांचे दुष्परिमाम, अतिलठ्ठपणा, आनुवंशिक थायरॉइड, अनियमित मासिक त्राव, ही महिलांना थायरॉइड ग्रंथीचा आजार होण्याची कारणे आहेत.
वजनात अचानक बदल झाला असे लक्षात आले, तसेच वरील पैकी जास्तीत जास्त लक्षणे आढळल्यास टीएसएच, टी 3, टी -4 थायराइड टेस्ट जरूर करून घ्यावे. यामुळे थायराइड ग्रंथी संबंधीत विविध रोग होण्यापासून रक्षण करता येईल.
एकाएकी आवाज बदलणे व बदलल्यानंतर बरेच दिवस पूर्ववत न होणे हे थायरॉइड व्याधीचेही लक्षण असू शकते.
थायरॉइड ग्रंथीचे कार्य नियंत्रित राहण्याकरीता काही उपाय
1) फणसामध्ये कॉपरचे प्रमाण मुबलक असते. त्याचा फायदा थायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवण्यास होतो. शरीरातील थायरॉईड हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
2) दोषांना मुखवटे बाहेर काढले जाते त्यास वमन म्हणतात. थायरॉईड(thyroid)आजारात वमन उपयोगी आहे.
3) विशुध्द चक्राला कार्यान्वित करण्याने कंठदोष, स्वरयंत्राचे विकार, थायरॉईड ग्रंथींचे विकार नियंत्रणात राहतात. यावर ॐ कार फायद्याचे ठरू शकते.
4) थायरॉईडसाठी ऐक्युप्रेशर थायरॉईडचा बिंदू वर दवाब देऊन तसेच त्या पॉईंट ला पंचर करून थायरॉइड नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
5) केवडा ही वनस्पती समुद्र किनार्यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.
6) सूर्यनमस्कारामुळे थायरॉइड मध्ये लाभ होतो.
7) विस्तारण या क्रियेच्या अभ्यासाने पाठीचा कणा सरळ व्हायला मदत मिळते. यामुळे पचनशक्ती सुधारते, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण येते व फुप्फुसांमधे शक्तिसंचार होतो.
8) पेरू मध्ये कॉपर असल्याने पेरू थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यास मदतगार ठरतो.
9) सर्वांगासन हे थायरॉईड ग्रंथीना पुष्टी देते ज्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, प्रजननसंस्था व कार्यरत राहतात.
10) तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते.
11) थायरॉईड झालेल्या रुग्णांसाठी तर अननसाचा रस फायद्याचा ठरतो.
(सोशल मीडियावरून साभार)