आपल्याला अनेक औषधी वनस्पती माहिती आहेत, मात्र जर त्या दुधात मिसळल्या तर त्याचे फायदे दुप्पट होतात. औषधी वनस्पती कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, शरीराच्या विविध वेदना आणि स्नायूंचा थकवा यांसारख्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात.
हळद आणि दूध: हळद ही औषधी वनस्पती आहे जी दुधात मिसळल्यास शरीरातील दुखणी तसंच जखमा दूर होतात. हळदीत कर्क्यूमिन असते जे अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतं. हे कर्क्यूमिन अँटीइफ्लामेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामुळे वेदना कमी करण्यास, स्नायूंना आराम करण्यास आणि रोगांपासून बरे होण्यास मदत करते.
दूध आणि अश्वगंधा: अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी शरीरासाठी फायदेशीर असतं. यामुळे ताण-तणाव कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. अश्वगंधाचा खास गुण म्हणजे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. यामुळे झोप, स्मरणशक्ती, स्नायूंचं आरोग्य स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
दूध आणि केशर: स्टॅमिना वाढवायचा असेल दुधात केशर मिसळा. केशरात अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे हार्मोनल आरोग्य सुधारण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर असतात. सतत मूड स्विंग होणाऱ्या व्यक्तींनाही याचा फायदा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)