सकाळी उठल्या-उठल्या रिकाम्यापोटी फक्त ‘हे’ एक काम करा

आरोग्य

सकाळी रिकाम्यापोटी गरम पाणी पिण्याचे फायदे

साधं गरम पाणी जर तुम्ही रिकाम्यापोटी प्यायलं तर ते आरोग्यासाठी चांगलंच आहे. पण जर गरम पाण्यात तुम्ही चिमूटभर किसलेलं आलं, हळद, मिरेपूड, १ टीस्पून तूप असं सगळं साहित्य घालून ते प्यायलं तर ते अधिक उत्तम. यासाठी पाणी पातेल्यात टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात हळद, मिरेपूड, आलं घाला आणि पाण्याला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर हे पाणी जेव्हा पिता येण्याजोगं होईल तेव्हा ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात तूप टाकून प्या.

रिकाम्यापोटी काेमट पाणी का प्याव

१) रात्रभर आपण पाणी प्यायलेलं नसतं. त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी सगळ्यात आधी गरम पाणी प्यावं.

२) गरम पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया अधिक चांगली होते. यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

३) हळद आणि आल्यामध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल घटक शरीर निरोगी राहण्यासाठी आणि शरीरावरची सूज कमी करण्यासाठी मदत करतात.

४) गरम पाण्यात मिरेपूड, हळद, आलं टाकून प्यायल्याने कफ, सर्दीचा त्रास होत नाही. तसेच राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

५) गरम पाण्यात जर लिंबाचा थोडा रस टाकून प्यायलं तर त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. आरोग्यासोबतच त्वचेचं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठीही मदत होते. नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून हे पाणी ओळखलं जातं. कारण हे पाणी प्यायल्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर स्वच्छ होण्यास मत होते.

(सोशल मीडियावरून साभार)