मायग्रेन म्हणजेच डोकेदुखी होण्याची कारणे व उपाय

आरोग्य

मायग्रेनची कारणे

मायग्रेन डोकेदुखीस कारणीभूत ठरणारे ट्रिगर पुढीलप्रमाणे आहेत.

डोळ्यांवर एकाएकी खूप प्रकाश पडणे,

पित्त वाढविणारा आहार घेतल्याने जसे, मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफी अधिक प्रमाणात सेवन करण्यामुळे,

‎अपुरी झोप, जागरण करण्यामुळे,

काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे,

भरपूर वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीकडे डोळे ताणून दिल्यामुळे,

डिहायड्रेशनमुळे,

हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना मायग्रेनचा त्रास होत असतो. विशेषतः मासिक पाळीच्या दिवसात अनेक महिलांना मायग्रेनचा त्रास होऊ लागतो.

प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हॉर्मोन्समधील बदलांमुळे,

मोठा गोंगाट कानावर ऐकू आल्यामुळे,

उग्र वास सहन न झाल्यामुळे,

मानसिक ताणतणावामुळे,

दररोजच्या प्रवासामुळे,

सिगारेट-तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनामुळे मायग्रेनचा त्रास होतो.

मायग्रेनवर हे आहेत उपचार

अर्धे डोके दुखणे यावर आपले डॉक्टर वेदनाशामक औषधे देतील. याशिवाय मळमळ व उलट्या थांबवण्यासाठीही काही औषधे ते देऊ शकतात. वारंवार मायग्रेनचा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मायग्रेनवर उठसुठ वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेणे योग्य नाही.

यापेक्षा वारंवार मायग्रेनचा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान व तपासणी करून योग्य उपचार करून घ्यावेत. मायग्रेन डोकेदुखीच्या नेमक्या निदानासाठी MRI किंवा CT स्कॅन यासारख्या तपासण्या कराव्या लागू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)