कमी रक्तदाबावर उपाय

आरोग्य

कमी रक्तदाबावर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कमी रक्तदाबावर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा पंधरा पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बदामाचं दूध रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरतं. रोज रात्री सात ते आठ बदाम पाण्यात भिजवून सकाळी त्या बदामाची सालं काढून त्याची पेस्ट करावी. ती पाण्यात किंवा दूधात उकळवून घ्यावी.

सकाळी उपाशीपोटी मनुके खाल्ल्याने फायदा होतो

बीट किंवा गाजराचा रस, लिंबूपाणी, आवळ्याच सरबत, नारळपाणी नियमित घेतल्यास कमी रक्तदाबाचा त्रास होणार नाही.

आहारात मीठाचं प्रमाण योग्य ठेवलं पाहिजे.

शरीरात पोषकतत्त्वांची कमतरता झाल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन-बी 12, व्हिटॅमिन सी, डी, ए युक्त आहार घेतला पाहिजे.

बदाम, रताळी, पालक, दूध, चीज, अंडी, मासे यांचा समावेश आहारात करावा.

(सोशल मीडियावरून साभार)