कुणी खाऊ नये भेंडी?
एलर्जी असलेल्यांनी:- जर तुम्हाला भेंडीच्या भाजीची एलर्जी असेल तर याचं सेवन करणं बंद करा. भेंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला पुरळ, खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास, पोटात वेदना अशा समस्या होऊ शकतात.
पचनासंबंधी समस्या असल्यास:- जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठता, जुलाब किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारख्या पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते.
डायबिटीस असेल तर:- भेंडीमध्ये ब्लड शुगर कमी करणारे गुण असतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचं औषध घेत असाल तर भेंडी खाण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
किडनी स्टोन:- किडनी स्टोन झालेल्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यात भरपूर ऑक्सलेट असतं. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर भेंडीची भाजी खाऊ नये.
गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या:- भेंडीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या होऊ शकतात. जशा की, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि अपचन. त्यामुळे अशा समस्या असलेल्या लोकांनी भेंडीची भाजी अजिबात खाऊ नये.
हाय ब्लड प्रेशर:- हाय ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांनी पोटॅशिअम असलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. भेंडीमध्ये भरपूर पोटॅशिअम असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर आणखी वाढू शकतं.
(सोशल मीडियावरून साभार)