पोटात गुडगुड आवाज येणे

आरोग्य

जेवण झाल्यावर काही वेळातच पोटात सतत गुडगुड आवाज येतो? कधी गॅस, कधी अपचन, कधी फुगलेलं पोट आणि मग दिवसाची वाट लागते. हे दिसायला सामान्य वाटलं तरी यामागे पचनतंत्र बिघडलेलं असतं.

उपाय आहे अगदी घरगुती आणि तो म्हणजे सुकं खोबरं. महागड्या गोळ्या, सिरप्स किंवा औषधं नकोत. फक्त रोजच्या जेवणानंतर १ चमचा सुकं खोबरं चावून खा. खोबरं हे अत्यंत गुणकारी मानलं जातं, ते पचनक्रिया सुधारतं, आतड्यांतील उष्णता कमी करतं आणि पोट शांत ठेवतं. सुकं खोबरं हे नैसर्गिक पध्दतीनं पचन सुधारतं. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलांमुळे गॅस तयार होत नाही. त्यामुळे जेवणानंतर होणारी पोटातली अस्वस्थता कमी होते, आणि त्याचा चवही छान लागतो.

रोजच्या जेवणात ही छोटी सवय लावा; १ चमचा सुकं खोबरं आणि पचन राहील तंदुरुस्त. त्यासाठी कोणतेही औषध लागणार नाही. फक्त या एका सवयीने ही समस्या मिटेल. शेवटी लक्षात ठेवा; पोट शांत, तर मन शांत. त्यामुळे पोटाशी मैत्री करा आणि सुकं खोबरं ही नैसर्गिक भेट रोजच्या आहारात सामावून घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)