सायाटिका हा शरीरातील सर्वात लांब मज्जातंतू आहे. हा कमरेपाशी सुरू होऊन पाया पर्यंत जातो. सायाटिका पेन म्हणजे सायाटिक मज्जातंतूच्या मार्गावर पसरणारी वेदना. सायाटिकाची तीव्र कळ कंबरेच्या खालच्या भागात सुरू होऊन पार्श्वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्यात पसरते. त्यामुळे साहजिकच पाय खूप दुखतात.
सायटीकाचा त्रास म्हणजे पायाच्या नसात तीव्र आणि असह्य वेदनांमुळे होणारा त्रास. या वेदनांमुळे पेशंट नीट चालू शकत नाही, कधी कधी तर एकाच स्थितीत उभाही राहू शकत नाही. यावेदना होण्या सोबतच अगदी दररोजची कामे करणे अवघड होऊन जाते. शरीरातील सायटीकाच्या नसा कंबरेच्या खालच्या भागातून सुरु होतात आणि पुढे हीप्स, मांड्या तसेच पायाच्या तळव्या पर्यंत जातात. सायटीका होण्याच्या मुख्य कारणात पायांवर दाब पडणे, पायांची आग होणे आणि सायकेटीव्ह नर्व्हस म्हणजेच पायाच्या खालच्या भागात झालेली दुखापत या कारणांचा समावेश आहे. याशिवाय स्नायूला झालेली दुखापत, स्नायू टाईट होणे किंवा पायांचा जास्त वापर होणे अशा कारणांचा सायटीकाचा त्रास होण्याच्या कारणात समावेश होतो. काही योगासनांच्या नियमित अभ्यासामुळे सायटीकाच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. याशिवाय ही आसने सायटीकाच्या लक्षणा पासून सुटका होण्यास मदत करतात.
योग आणि सायटीकाचे दुखणे
भुजंगासन आणि शलभासन सारखी आसने सायटीकाच्या लक्षणांना बरे करण्यास मदत करतात.
गंभीर स्वरूपाचे लोअर बॅक पेन
कामकाज करताना त्रास होत असताना
पेन कीलर वापर
जर योग शिक्षकाच्या देखरेखी खाली योग्य पद्धतीने आसने केलीत तर त्याचे फायदे मिळू शकतात. सायटीकाच्या दुखण्या पासून आराम मिळण्यासाठी करावयाच्या १० योगासना विषयी माहिती.
१) बालासन
या आसनामुळे आराम मिळायला आणि आरोग्यपूर्ण रहायला मदत मिळते. हे पाठीच्या कण्याला स्ट्रेच करायला मदत करते. हे हिप्स मध्ये लवचिकता वाढवते; तसेच हिप्स, मांड्या आणि कमरेच्या खालच्या भाग आखडला असेल तर यापासून आराम मिळायला मदत करते. जर दुखणे जास्त असेल आणि सहजपणे आसन करू शकत नसाल, तर मांडीखाली, छातीखाली, डोक्याखाली तक्क्या किंवा उशी ठेऊन ही आसने करू शकता.
२) अधोमुख श्वानासन
पुढच्या बाजूला वाकून केले जाणारे हे आसन शरीर एका स्थितीत अलाईन करायला मदत करते. या आसनामुळे वेदना आणि स्नायू मोकळे व्हायला मदत होते. हे आसन केल्याने शरीरातील ऊर्जेचा संचार वाढते आणि योग्य संतुलन राखायला मदत होते.
३) अर्ध चंद्रासन
हे आसन शरीराला शक्ती, स्थिरता आणि बॅलन्स राखायला मदत करते. हे आसन शरीराची लवचिकता वाढवते. ताण कमी करून पाठीच्या कण्या सोबतच ग्लूट्स आणि मांड्या चांगल्या पद्धतीने स्ट्रेच करते. जर हे आसन पहिल्यांदा करत असाल तर सपोर्टसाठी भिंतीला टेकून मदत घेऊ शकता. याशिवाय हात खाली ब्लॉक करू शकता.
४) भुजंगासन
शरीराला आराम देणारे हे आसन पाठीचा कणा मजबूत करण्या सोबतच मणक्याला चांगला ताण देणारे आहे. शरीरातील लवचिकता आणि रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते.
५) शलभासन
हे आसन पाठीचा कणा, ग्लुट्स आणि मांड्या मजबूत करण्यास मदत करते. तसेच कोर आणि खालच्या पाठीला स्थिर करते. हे नितंबा मध्ये रक्ताभिसरण, लवचिकता वाढविण्यास मदत करते.
6) पवनमुक्तासन
पाठीच्या खालच्या भागात, हिप्स ग्लुट्स मधील स्नायूंचा घट्टपणा दूर करण्यास मदत करते. हे आसन सोपे करण्यासाठी, एका वेळी एकाच पायाने करू शकता.
७) राजकपोतासन
याच्या सरावाने कंबरेला पाठीच्या खालच्या भागाला आधार देण्यास मदत होते आणि हिप्सवर कमी दबाव पडतो. हे केल्याने, ग्लूट्स आणि हिप्स तसेच पायरीफॉर्मिस स्नायूंना स्ट्रेचिंग मिळते.
८) सेतु बंध सर्वांगासन
याच्या सरावाने पाठीचा कणा ताणला जातो आणि शरीरात होणार्या वेदना, तणाव कमी होतो. त्याचा हळू हळू परिणाम शरीरात रक्त परिसंचरण वाढवण्यास मदत करतो. याशिवाय ते पाय, ग्लूट्स आणि कोर मजबूत करण्यास मदत करते.
९) अर्ध मत्स्येंद्रासन
शरीर वाकवून केलेले हे आसन मणक्याला ताणते आणि उघडते. यामुळे वेदना आणि तणावातून आराम मिळतो. याशिवाय शरीर वळवताना पाठीच्या खालच्या भागात यामुळे दिलासा मिळू शकतो.
१०) विपरीत करणी
या आसनाच्या नियमित सरावाने शरीराला ऊर्जा प्राप्त होते. हे शरीराला आराम करायला, रिलॅक्स करायला आणि रिकव्हर करण्यास मदत करते. या आसनाचा सराव करण्यात अडचण येत असेल तर हिप्सच्या खाली उशी ठेवू शकता.
काय काळजी घ्यावी
सायटीकाचा त्रास होत असेल तर काही आसने केल्यामुळे दुखणे वाढू शकते. अशात शरीराची क्षमता समजून योगासने केली पाहीजे. जर कोणतेही आसन करताना थोडाही त्रास झाला तर लगेच ते योगासन करण्याचे थांबवावे. ज्या आसनात पुढे वाकून किंवा ताठ उभे राहून करावे लागणार असेल आणि त्यामुळे वेदना होत असतील तर अशी आसने करु नयेत. केवळ अधोमुख श्वानासन याला अपवाद आहे. हे आसन केले तरी चालू शकते. जी आसने केल्याने पेल्व्हिस आणि लोअर बॅक मध्ये लगेचच वेदना सुरु होत असतील तर ती करु नये. सायटीकाच्या वेदना शक्यतो एकाच पायात होतात. अनेकदा या वेदना अतिशय असह्य असतात. म्हणूनच एखादे आसन एका पायाने करताना त्रास होत असेल तर दुसर्या पायाने करावे. कोणतेही आसन करताना गुडघे मुडपून करू शकता. जर असे असे करताना काही त्रास होत असेल तर गुडघ्याच्या खाली तक्क्या घेऊन करू शकता. जर २ महिन्या पेक्षा अधिक सायटीकाचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्या शिवाय योगाभ्यास करू नये.
(सोशल मीडियावरून साभार)