केस गळती, कोंडा, अकाली पांढरे होणे आणि केस विरळ होण्याच्या समस्यांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. बाजारात उपलब्ध केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर वाढत असला, तरी त्याचे दुष्परिणामही तितकेच वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आजीबाईंच्या काळातील घरगुती आणि नैसर्गिक उपायांकडे पुन्हा एकदा लोकांचा कल वाढताना दिसतो आहे.
पूर्वी महिलांचे केस दाट, लांब आणि मजबूत असायचे. त्यामागे कोणतेही महागडे प्रॉडक्ट नव्हते, तर नैसर्गिक तेलं, बिया आणि औषधी वनस्पतींचा नियमित वापर होता. आजही हे उपाय तितकेच परिणामकारक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
आवळा तेल केसांच्या मुळांना मजबुती देतो आणि केस गळती कमी करण्यास मदत करतो.
मेथी पावडर केसांना पोषण देत दाट आणि मजबूत बनवते.
भिजवलेले तीळ केसांना आवश्यक पोषक घटक पुरवून नैसर्गिक काळसरपणा टिकवतात.
तर नारळ तेल व लिंबू यांचा वापर स्कॅल्प स्वच्छ ठेवून कोंड्याची समस्या कमी करतो.
नियमितपणे या घरगुती उपायांचा अवलंब केल्यास केसांचे आरोग्य सुधारते, तसेच केमिकल्समुळे होणारे नुकसान टाळता येते. सौंदर्य टिकवण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
(सोशल मीडियावरून साभार)