तुम्ही पित्ताची गोळी रोज किंवा वारंवार खात असाल तर सावधान
पित्ताच्या गोळीचे दीर्घकाळ सेवन केल्याने किडनीवर घातक परिणाम होऊन, किडनी खराब होऊ शकते.
फूड अँड ड्रग असोसिएशनने पित्तशामक औषधांवर यापुढे ”सावधानतेचा इशारा” लिहीणे बंधनकारक केले आहे.
औषधांच्या सततच्या वापराने किडनीवर दुष्परिणाम होतो असा इशारा यापुढे या गोळ्यांवर लिहीला जाईल.
पित्ताच्या गोळ्या जास्तीत जास्त ५-७ दिवस घेणे ठीक आहे. मात्र ६ आठवड्यांहून अधिक काळ या गोळ्या घेत राहील्यास, त्याचा किडनीवर घातक परिणाम होतो.
किडनी सोबतच हळूहळू मेंदू, हृदय यांच्यावरही याचा गंभीर परिणाम होतो.
पित्ताची गोळी वारंवार खाल्ल्याने जठरातील अॅसिड कमी होतं. परिणामी हळूहळू जठराची व आतडयांची रोगप्रतिकारशक्ति कमी होते. आणि मग, पोटात वारंवार इन्फेक्शन होऊ लागते.
शरीरात लोहाची कमतरता निर्माण करते. परिणामी रक्त कमी पडू लागते. यालाच Anaemia किंवा रक्ताल्पता असे म्हणतात.
कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन, हाडे ठीसूळ बनतात.
Vitamin B-12 ची कमतरता निर्माण होते. त्यामुळे वारंवार तोंड येते, तोंडात छाले पडतात.
अनेक जन सकाळी दात घासून झाल्यावर, घशात बोटं घालून उलटी काढतात आणि पित्त पाडतात. मात्र ही सवय घातक आहे. यामुळे अन्ननलिकेच्या आतल्या अस्तराला सूज येते. आणि दीर्घकाळ अशा प्रकारे पित्त काढल्यास अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.
पित्त होऊ नये यासाठी या ३ गोष्टी करणे टाळा, हरी, करी आणि वरी
‘हरी’ म्हणजे प्रत्येक गोष्टींत घाई, अनियमितता, सतत पळापळ, अपुरी विश्रांती व जागरणांनी भरलेली दिनचर्या.
‘करी’ म्हणजे तळलेले चमचमीत मसालेदार पदार्थ, हॉटेलमधील खाणं, धूम्रपान, मद्यपान, अतिप्रमाणात चहा-कॉफी घेणं, कोल्डड्रिंक्स पिणे.
तर ‘वरी’ म्हणजे चिंता, काळजी, ताणतणाव, असमाधान, डिप्रेशन.
पित्त झाल्यानंतर औषधे घेण्याऐवजी पित्तच होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करावे.
(सोशल मीडियावरून साभार)