मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो.
आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहे. जे खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होईल. याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी दिली.
या मसाल्यांमुळे मधुमेह येईल आटोक्यात
मेथीच्या दाण्यात फायबर असते. हे शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि गॅलेक्टोमनन असते ज्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करते. यामुळे इन्सुलिन सुधारते.
तेजपत्त्यामध्ये रक्तातील साखर कमी करणारे घटक असतात. यामुळे ग्लुकोज नियंत्रणात होऊन चयापचय सुधारते. हे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
दालचिनीमध्ये अँटी-बायोटिक, अँटी- इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. तसेच शरीरातील इन्सुलिन स्राव होण्यास मदत करते.धणे आणि लवंगमध्ये कार्बोहायड्रेट चयापचय सुधारण्याचे घटक असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुरळीत राहाते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास चहा
साहित्य
मेथी दाणे – अर्धा चमचा
तेजपत्ता – १
दालचिनी – १
धणे – १ चमचा
लवंग – १ चमचा
पाणी – १ ग्लास
कृती
सगळ्यात आधी १ ग्लास पाणी घेऊन उकळत ठेवा.
त्यात वरील सर्व साहित्य घालून उकळून घ्या.
गाळून कोमट झाल्यानंतर दिवसातून एकदा प्या. यामुळे शरीरातील डिटॉक्स बाहेर पडेल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहिल.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे मसाले मदत करु शकतात. याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा.
(सोशल मीडियावरून साभार)