कारणे…
वेळीअवेळी खाणे, जड अन्न खाणे, भरपेट खाणे, घाईघाईने खाणे, मांसाहार करणे, टेन्शन घेणे, जेवताना मध्ये-मध्ये पाणी पिणे, मलमूत्र रोखून धरणे, जास्त चहा/काँफी/थंड पेय/थंड पाणी पिणे. जास्त बटाटा, रताळी, बेसनाचे पदार्थ, वाटाणे, चवळी, पावटा, चणाडाळ, तुरडाळ, तेलकट पदार्थ वारंवार खाणे. व्यसन करणे इ.
लक्षणे…
छातीत, पाठीत दुखणे. मळमळणे, ओकारी येणे, पोट फुगणे, ढेकर येणे, अपचन होणे. पोटात गँस होणे. पोट साफ न होणे. इ.
उपाय…
१) वरील कारणे कमी करा.
२) जेवणात कच्चे खा. कांदा, गाजर, बीट इ.
३) जास्त उपवास करू नका.
४) प्राणायाम, योगासने, श्वासावरती सूक्ष्म शारीरिक हालचाली करा. चालणे/धावणे (रोज १ तास) सावकाश करा.
५) कोमट पाणी पिण्याची सवय करा. किंवा जिरे पाणी प्यावे.
६) सुंठवड़ा/आवळा पदार्थ खा.
७) पोट शेकवा, माँलिश करा.
८) गरम पाणी + ओवा + लिंबू रस + जिरे + काळे मीठ सरबत करून प्या. किंवा जिरे + दालचिनी पाण्यात चांगले उकळून घ्या नंतर त्यामध्ये लिंबू रस + सैंधव मीठ टाकून मिक्स करून प्या. उत्तम उपाय आहे.
९) नियमित पवनमुक्तासन, वज्रासन करा. गॅस निघेल.
१०) व्यायामाने पचनशक्ती Strong करा.
११) साखर टाळा, गुळ खा किंवा गुळाचे पदार्थ खा.
१२) रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण लहान चमचा + कोमट पाणी किंवा एक कप दूध + एक चमचा गाईचे तुप घेवून पोट साफ ठेवा.
१३) तेलाचे प्रमाण कमी करून देशी गाईचे तुप आहारात वापरा.
१४) काळी मनुका किंवा आवळा खा. त्यामुळे अँसिडिटी कमी होते.
१५) रात्री एक तयार केळ खा. पोट नरम राहते. पोट साफ होते.
१६) जेवणानंतर थाेडा गुळ खाणे. अन्नपचन चांगले होते. तसेच वज्रासनात १५ मिनिटे बसा. शतपावली करा.
१७) मैदा पदार्थ खाऊ नका. मैदा म्हणजे अन्नपदार्थातील फेव्हीकोलच आहे. आतड्यांना चिकटून राहतो.
१८) ओवा + बडीशेप + जिरे + जवस (आळशी) समप्रमाणात घेऊन लोखंडी तव्यावर गरम करा. नंतर लोखंडी खलबत्त्यामध्ये जाडसर पावडर करा. थोडेसे चवीपुरते साधे /काळे मीठ मिक्स करा. हे चूर्ण दिवसातून २ /३ वेळा चघळूण खाणे. पोटाचे सर्वच विकार लवकर कमी होतात. हा जबरदस्त उपाय आहे.
१९) जेवणामध्ये आंबट पदार्थ केव्हाच खाऊ नका. तसेच भाजी अगर आमटी / रसा यामध्ये पण वापरू नका. उदा. कोकम, चिंच, टोमॅटो इ. कारण आंबट पदार्थांमुळे पचनसंस्था कमजोर होते.
२०) भाज्यांमधील टोमॅटो जठरात पडून राहतो. व तेथेच कुजण्याची क्रिया सुरू होते. म्हणून जास्त गॅसेस होतात.
२१) बेकरीतील पदार्थ टाळणे. चहाबरोबर केव्हाच खाऊ नका. त्यामध्ये मीठ असल्याने चहातील दूध फाटते (नासते) अपचन होऊन जास्त गॅसेस होतात.
२२) फायबर अन्नपदार्थ खाणे. भेंडी, गवार, सालीसह कडधान्य, पेरू, पपई, पालेभाजी, फळे इ.
२३) पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा.
२४) आम्लपित्ताचा त्रास असल्यास काळी मनुका, आवळा, आले खाणे.
२५) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
(सोशल मीडियावरुन साभार)