मेष: नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील वाद मिटतील. घरातील लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आनंदी वातावरण राहील. सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढेल. काही प्रमुख नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राच्या भेटीने मन प्रसन्न होईल.
वृषभ: धैर्य व आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील अडचणी दूर होतील. आरोग्य सुधारण्याचे संकेत आहेत. मात्र काही गोष्टींची चिंता सतावू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. कोर्टकचेरीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.
मिथुन: आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक ठरेल. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून नफा मिळेल. प्रवासादरम्यान महत्त्वाची माहिती मिळू शकते. काही नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि आर्थिक मार्ग खुले होतील.
कर्क: सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. ऊर्जा योग्य दिशेने वापरा. मुलांच्या शिक्षणाबाबत त्यांच्याशी संवाद साधा. भावंडांसोबत कौटुंबिक व्यवसायावर चर्चा होईल. जोडीदाराशी प्रामाणिक राहा. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळख निर्माण होईल.
सिंह: कौटुंबिक नाती मजबूत होतील, मात्र खर्च वाढल्याने ताण येऊ शकतो. डोकेदुखी व डोळ्यांचे त्रास संभवतात. प्रेमात असलेल्यांसाठी दिवस रोमँटिक असेल. अनावश्यक खर्च टाळा. व्यवसायासाठी दिवस अनुकूल आहे.
कन्या: उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन उत्पन्न स्रोत निर्माण होतील. आरोग्य सुधारेल. कामासाठी नवीन संधी शोधाल. पचनसंस्थेची काळजी घ्या. पालकांच्या आशीर्वादाने कामे यशस्वी होतील.
तूळ: व्यवसायात भागीदारीतून नफा होईल. नवीन लोक सहकार्य करण्यास तयार होतील. कोर्टातील वादात तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता. घरी छोटेखानी समारंभ होऊ शकतो. दिखाव्यासाठी खर्च टाळा.
वृश्चिक: भाग्याची साथ लाभेल. कामातील अडथळे दूर होतील. जोडीदारासोबत नवीन प्रकल्प सुरू करू शकता. मुलांच्या शिक्षणातील समस्या सुटतील. कामानिमित्त प्रवास संभवतो. वरिष्ठांशी संबंध सुधारतील.
धनु: गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून निराशाजनक बातमी मिळू शकते. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना आणि आरोग्याबाबत सावध रहा.
मकर: दिवस सकारात्मक आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद मिटतील. नवीन संधी मिळू शकते. पदोन्नतीसाठी बदल संभवतो. आईशी मनमोकळा संवाद साधाल. प्रेम व्यक्त केल्याने चांगले परिणाम दिसतील.
कुंभ: बोलण्यात संयम ठेवा. महत्त्वाची माहिती कुणालाही सांगू नका. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. भावंडांसोबत मालमत्तेवर चर्चा होईल. अनेक कामे एकाच वेळी टाळा. राजकीय निर्णय सावधपणे घ्या.
मीन: दिवस समाधानकारक ठरेल. मुले अपेक्षा पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. अध्यात्माकडे ओढ वाढेल. नवीन व्यवसाय योजना फायदेशीर ठरतील. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.